…आता इकबाल चहल

  • Written By: Published:
…आता इकबाल चहल

प्रफुल्ल साळुंखे

मुंबईः मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना ईडी चौकशीबाबत समन्स मिळाल्याचं समोर आलं आहे. चहल जात्यात का आले? की परमवीर सिंग यांच्यासारखे बॉम्बला फोडण्यासाठी लागणारी ‘ वात ‘ ची भूमिका बजावतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

गेल्या वर्षात अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे राळ उठवली गेली. एक वर्ष या प्रकरणात अनिल देशमुख यांना कारागृहात जावं लागलं. सध्या तरी या प्रकरणात कुठलंही तथ्य नसल्याचं समोर आलं. या संपूर्ण प्रकरणात मोलाची भूमिका तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी बजावली होती. खर तर महाआघाडीमध्ये कमालीचा विरोध असताना ही परमवीर सिंग यांना पोलीस आयुक्तपदावर बसवण्यासाठी ज्यांनी जोर लावला. ते आज शिवसेनेतून बाहेर आहेत. पण भाजपा केंद्रीय आणि स्थानिक नेत्यांनी परमवीर सिंग यांचा योग्य वापर केला हे जग जाहीर आहे.

१०० कोटी रुपयांचे पत्रसमोर आणून महाआघाडी नेस्तनाभूत करण्यापर्यंत हे प्रकरण गेले. म्हणजेच परमवीर सिंग हे अनिल देशमुख आणि महाआघाडीला लावलेल्या फटक्याची पेटणारी वात ठरेल. आज ही भूमिका इकबाल चहल निभावत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चहल गेल्या महाआघाडी सरकारची दोन वर्ष वगळता गेली पाच वर्ष गिरीश महाजन यांच्या जलसंपदा विभाग सांभाळत होते. या कारभारात राज्यात मोठ्या प्रकल्पांना मिळालेल्या सुप्रमा आणि प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना पश्चिम महाराष्ट्रमध्ये मिळालेल्या प्रकल्पात मोलाची भूमिका बजावली होती, अशी चर्चा त्या काळात रंगली होती.

एकेकाळी भाजपच्या गळ्यातील ताईत असलेले चहल यांची अचानक महाविकास आघाडीत मुंबई महापालिकेत अतिशय महत्त्वाच्या पदावर नियुक्ती अनेकांच्या भुवाया उंचावणारी होती. चहल यांना या पदावर बसवण्यासाठी भोसले यांचा मोठा वाटा असल्याचं त्याकाळी कुजबुज देखील झाली. ज्यावेळी भोसले यांना एका प्रकरणात अटक झाली. त्यावेळी महाआघाडी सरकार स्थापन करण्यात तसेच पश्चिम बंगाल निवडणुकीत भोसले यांची रसद पुरविल्याची चर्चा जोरात होती. म्हणूनच की काय भोसले आज कारावासात आहेत का ? असेही तर्कवितर्क लढवले जातात. या पार्श्वभूमीची चर्चा असल्यानेच आता चहल रडावर आले आहेत का? हा देखील विषय महत्त्वाचा आहे.

चहल यांची चौकशी होऊन तो धागा , तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यापर्यंत येऊन थांबेल.जाधव इडीच्या भीतीने सध्या सत्तेत आहेत. अशा परिस्थितीत मातोश्रीवर खोके पोहाचल्याचा आरोप त्यांच्याकडून झाला तर त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. मातोश्रीवर झालेला आरोप, मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारातला मुख्य मुद्दा असेल.
एकूणच काय, तर परमवीर सिंग यांच्याप्रमाणे चहल हे शिवसेनाचा धमाका करण्यासाठी फटाक्याची वात बनले का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube