पुणे : मराठी तरुण नोकरी करत नाही किंवा त्यांना अटी सांगून काम करायची सवय आहे, अशी परिस्थिती नाही. पण मराठी तरुणांना याची माहिती नसते. ती मराठी तरुणांपर्यंत पोहचवायला हवी. अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज ठाकरे पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे […]
पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात दहशत निर्माण करण्याऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या पुण्याची वाटचाल भाईगिरीकडे सुरु झाली की काय ? असं वाटू लागलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण रस्त्याने जाताना ओळख दाखवत असताना भाई म्हंटल नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात रॉड घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील […]
मुंबईः शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे पुन्हा अडचणीत आले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा यांनी मानहानीच्या दाखल केलेल्या दाव्यात राऊतांविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले आहे. मुंबईच्या शिवडी न्यायालयाने हे वारंट जारी केले आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारीला ठेवण्यात आली आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत […]
पुणे : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता.6 जानेवारी) राज्याच्या महाधिवक्त्यांना केली. पाटील यांनी आज पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत राज्याचे […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षेनेते अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यात आल्याने ही […]
पुणे : ‘मिशन 45’ काही मोठी गोष्ट नाही. दोन वेळा आम्ही 43 सीट राज्यात आणून दाखवल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचं मिशन पूर्ण करू शकतो, असा विश्वास भाजप नेते आणि राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज (ता.5 जानेवारी) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला फडणवीस म्हणाले, आम्हाला असं वाटतं की आम्ही ‘मिशन 45’ पूर्ण […]