Crime : संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री हादरली; किरकोळ कारणावरून दोघांना भोकसलं, एकाचा मृत्यू
Murder at Fulumbri : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे महात्मा फुले चौकात टपरीचालकाशी किरकोळ कारणावरून हुज्जत घालून सात ते आठ जणांनी टपरीचालकासह एका फळ विक्रेत्याला चाकूने भोसकलं. (Murder) या घटनेत नजीर खान मुनीर खान या तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना अटक करेपर्यंत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
Video : महिला अत्याचार घटना कधी थांबणार? मविआचं संभाजीनगर विमानतळावर PM मोदींविरोधात आंदोलन
नजीर खान यांची महात्मा फुले चौकात पानटपरी असून, त्यांच्या समोरच शेख सुल्तान यांचा हातगाडीवर फळ विक्रीचा व्यवसाय आहे. आठ जणांनी पान टपरीवर खरेदी केली. त्या वेळी टपरीचालकासह त्यांचा वाद झाला. शेख सुल्तान यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला असता, नजीर खान आणि सुल्तान यांच्यावर आरोपींनी वार केले. यात नजीरचा मृत्यू झाला.
आरोपींना अटक करा अशी मागणी करून सकाळी दहा वाजल्यापासून दुपारपर्यंत महात्मा फुले चौकात मुस्लिम समाजबांधवांनी गर्दी केली होती. त्यांनी एक तास ठिय्या आंदोलन केलं. महात्मा फुले चौकात ३००पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘फरारी आरोपींना अटक करण्यात येईल. तसंच, सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे, असे लेखी आश्वासन पोलिस प्रशासनाने दिलं.
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेचा SIT कडून प्राथमिक रिपोर्ट सादर; धक्कादायक माहिती आली समोर
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नजीर खान यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक लांजेवार यांनी दिली. सचिन अण्णासाहेब पल्हाळ, आर्यन सुरेंद्र भालेराव, सागर मिलिंद शिंदे, पवन मोहन खडसान, गोकुळ भादवे, अजिंक्य रवी साळवे, अमोल जाधव व एक अनोळखी (सर्व रा. हर्सुल) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, पोलीस तीन आरोपींचा कसून शोध घेत आहेत.