पालघरमध्ये पावसाचा हाहाकार; विद्यार्थिनी करतायत टायरवर बसून नदी पार

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 12T162530.881

पालघर, विक्रमगड व वाडा तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या म्हसेपाडा गावाची अवस्था अतिशय दयनीय असून पावसाळ्याच्या चार महिने गावाला दोन नद्यांचा वेढा असल्याने धोकादायक अवस्थेत नदी पोहून किंवा टायच्या टूब च्या सहाय्याने नदी पार करावी लागते आहे.

अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…

या भागातील विद्यार्थिनी व गावांतील नागरीकांना अशा धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागतो आहे. या दरम्यान, आज याच पाड्यातील बालिकेला आपला जीव गमवावा लागला आहे.  या पाड्यातील लोकांना पुल किंवा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आणखीन किती जणांचा बळी जाण्याची वाट शासन बघत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…

पावसाळयातील बहुतांश दिवशी बंधारा पाण्याने भरलेला असल्याने शाळा गाठण्यासाठी मुलींना तर येथील लोकांना टायर मधील ट्यूब फुगवून त्याआधारे नदी पार करावी लागते. मात्र शासन नेहमीच या आदिवासी पाड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे भयान वास्तव समोर येत आहे.

अशा परिस्थितीमुळे आत्तापर्यंत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या मुसळधार पाऊस सूरू असून नदीला प्रचंड पूर आलेला असतानाही येथील जनतेला व विद्यार्थिनींना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.

Tags

follow us