पंतगराव कदम आमचे खंदे समर्थक…, शरद पवार यांचं वक्तव्य

पंतगराव कदम आमचे खंदे समर्थक…, शरद पवार यांचं वक्तव्य

पुणे : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम त्या काळात आमचे खंदे समर्थक होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय. पुण्यात आज पतंगराव कदम यांच्या जन्मदिनी त्यांच्या नावे पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी सिरम इन्सस्टिट्युटचे अदर पुनावाला यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

पवार म्हणाले, पतंगराव कदम अतिशय आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी शून्यातून विश्व उभे केलं आहे. पतंगराव सांगलीतील एका छोट्याशा गावातून आले होते. रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका या योजनेअंतर्गत शिकले आणि नंतर पुण्यात त्यांनी भारती विद्यापीठ सारखी शिक्षणसंस्था उभी केली.

पतंग कदम यांनी उभे केलेले काम पाहताना तुम्हा-आम्हां सर्वांना अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा पहिला पुरस्कार अदर पुनावाला यांना देण्यात आला. आज जगात सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली व्हॅक्सिन वापरली जाते.

जगात जवळपास 160 देशात पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेली व्हॅक्सिन वापरली जात असल्याचं त्यांनी म्हंटलंय. अदर पूनावाला यांनी हे सर्व करत असताना सामाजिक भान राखण्याची देखील त्यांनी काळजी घेतली, त्यांनी शहरातील कचरा वाहून नेण्यासाठी जवळपास 100 पेक्षा अधिक वाहने पुणे महानगरपालिकेला दिली.

दरम्यान, पतंगराव कदम यांचा अनेक वर्षांचा कालखंड रयत शिक्षण संस्थेत गेला असून रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान असल्याचंही ते म्हणाले आहेत. त्या काळात ते आमचे खंदे समर्थक होते, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिरमचे अदर पूनावाला आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube