मुंबईत आजपासून प्लॅस्टिक पिशवी बंद, नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

मुंबईत आजपासून प्लॅस्टिक पिशवी बंद, नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

मुंबई : भाजीपाला, दूध, फळं किंवा किरकोळ वस्तू खरेदी करताना प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग बाळगणे किंवा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घेणे आता महाग होणार आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी (Ban plastic bags) घातली असून आजपासून प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास धडक कारवाई करण्यात येणार आहे.

दुकानदार, फेरीवाले आणि मॉल्सवर एका पोलीस अधिकाऱ्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी आणि तीन महापालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईदरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची पिशवी आढळून आल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर ग्राहकांकडे अशा पिशव्या आढळून आल्यास प्रबोधन करून कारवाई करण्यचा इशारा माहिती आयुक्त संजोग काबरे यांनी दिला.

पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची शिफारस करणार, मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा 

मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुरास प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याच्या पार्श्वभूमीवर 2018 मध्ये राज्य सरकारने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर आणि उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. प्रतिबंधित प्लॅस्टिक विरोधातील कारवाईसाठी पथकै तैनात केली होती. मुंबईत महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागाकडून नियमित कारवाई केली जात होती. पण 2020 मध्ये कोरोनाने मुंबईत प्रवेश केला आणि बंदी घातलेल्या प्लॅस्टिकची कारवाई थंडावली. मात्र, कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर 1 जुलै 2022 पासून पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या परवाना विभाग, बाजार व दुकान व आस्थापना विभागाकडून ही कारवाई करण्यात येत होती. तरीही त्या कारवाईला फारसा वेग नव्हता. आता मात्र पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारवाईत पुढाकार घेण्याचं ठरवलं. पोलीस आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे.

पालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत उत्पाक, साठेदार, पुरवठादार आणि विक्रेत यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना महाराष्ट्र विघनटनशील आणि अविघटनशील कचरार (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 अन्वये पहिल्या गुन्ह्यासाठी 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल. तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube