Rakhi Sawant Mother Died : राखी सावंतच्या आईचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अयशस्वी
मुंबई : अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या आई जया भेडा यांचं निधन (Rakhi Sawant mother passes away) झालंय. मुंबईतील टाटा रुग्णालयात (Tata Hospital)रात्री साडेआठच्या सुमारास जया भेडा-सावंत (Jaya Bheda Sawant)यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपचारांमुळं त्या चर्तेत होत्या. राखी सावंतवरचं मातृछत्र हरपलंय. या महिन्याच्या सुरुवातीला राखीनं आईला ब्रेन ट्यूमर (Brain Tumor)झाल्याचं सांगितलं होतं.
बिग बॉस मराठीच्या (Big Boss) घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत आईच्या आजारपणामुळं चर्चेत आली होती. आईबाबत सोशल मीडियावर ती नेहमी काहीतरी पोस्ट करत होती. मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात जया सावंत यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून जया यांच्यावर येथेच उपचार सुरू होते. आईच्या निधनामुळे राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राखीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये, राखी या एनजीओमधल्या मुलांना खाद्य पदार्थांचे वाटप करताना म्हणत होती, की माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. राखी सावंत हिची आई जया सावंत यांना कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमरही झाला होता.
सावंत यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांनी उचलला होता. याबद्दल राखीने त्यांचं आभार मानले. दरम्यान आईवर उपचार सुरू असतानाच राखीने आपला दुबईतील प्रियकर अदिलबरोबर लग्न करून सर्वांना धक्का दिला होता.