प्रजासत्ताक दिनी मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका; पोलीस अलर्ट मोडवर

प्रजासत्ताक दिनी मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका; पोलीस अलर्ट मोडवर

मुंबई : देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईबरोबरच देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर आहेत. शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी २६ जानेवारीला मोठी परेड होत असते. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. परंतु यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच या परिसरात कसून चौकशी केली जात आहे.

आज सकाळपासूनच परेडची तयारी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. तसेच शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे. शिवाय उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांनी सांगितलं आहे.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाची परेड होत असतात. दरवर्षी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावेळी मुंबईच्या महापौरांसह पालकमंत्री आणि इतर मंत्री तसेच आमदारही उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने दरवर्षी पोलिसांच्या कवायतीही होत असतात. मात्र, यंदा शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. शिवाजी पार्कात उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी शिवाजी पार्कात १७ चित्ररथाचे पथसंचलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या खात्यांची माहिती पटवून देणारे हे सर्व चित्ररथ असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube