खासदार शेवाळे प्रकरणः राष्ट्रवादीच्या रुपाली पाटीलच आल्या अडचणीत; चाकणकरांचे कारवाईचे संकेत

  • Written By: Published:
खासदार शेवाळे प्रकरणः राष्ट्रवादीच्या रुपाली पाटीलच आल्या अडचणीत; चाकणकरांचे कारवाईचे संकेत

पुणेः शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर महिलेने शोषणाचे आरोप केले आहेत. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पीडित महिलेची ओळख उघड केली. त्यामुळे ठोंबरे अडचणीत आल्या आहेत. पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी ठोंबरे यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिलेत.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. चाकणकर म्हणाल्या, दुबई आणि ओमानेमध्ये काही भारतीय महिला कामानिमित्त गेल्या आहेत. तिकडे त्यांचे लैगिक आणि मानसिक त्रास दिला जातो. अधिवेशन दरम्यान काही लोक प्रसिद्धीसाठी पीडितेचे नाव घेत आहे. पत्रकार परिषदेत नाव घेतली जातात, हे चुकीचे आहे, अशा पद्धतीने पीडितेचे नाव घेऊ नये. यासंदर्भात महिला आयोगाकडून प्रधान सचिवांना पत्र पाठवलं जाणार आहे.

राहुल शेवाळे प्रकरणी महिला आयोगाने आतापर्यंत सहा पत्र पोलिसांना पाठवली आहेत. मात्र आमच्यावर प्रचंड दबाव आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पीडितेची तक्रार घेण्यात आली नाही. या तपासात केंद्रापासून राज्यापर्यंत दबाव आहे असं दिसतंय, असा आरोप चाकणकर यांनी केलाय.

राहुल शेवाळेप्रकरणी पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाईबाबत चाकणकर म्हणाल्या, पीडितेचे नाव घेणे किंवा तिला कॅमेऱ्यासमोर आणून पीडितेचे ओळख लोकांसमोर आणणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी काल राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनाकडून तक्रारी आल्या आहेत. ठोंबरे यांच्यावर कारवाईबाबत विधी सेवा प्राधिकरणाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube