Prakash Ambedkar यांनी शब्द जपून वापरावे, संजय राऊतांचा सल्ला
मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शरद पवार (sharad pawar) भाजपचेच असल्याचं वक्तव्य केलं. यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. शिवसेना ( Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीची चार दिवसापुर्वी युती झाली. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्या विषयी अश्या प्रकारचे वक्तव्य करणं आम्हाला मान्य नाही.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अख्या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहेत. शरद पवार भाजपचे आहेत असं म्हणणं, हे आता पर्यंतच्या कारकिर्दीवरचा फार मोठा आरोप आहे. जर ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापुर्वी भाजपच सरकार दुर ठेवुन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊच दिलं नसते. अश्या प्रकारच्या भुमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपुन वापरावे. भुतकाळातील मतभेद आपल्याला दुर ठेवले पाहिजे.
तसेच, महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही, असं नाना पोटले म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, ‘आम्ही राहुल गांधीशी यांच्यासोबत माझं त्यांच्याविषयी बोलणं झालं आहे. एका रात्री पारड पलटण्याची धमक ही फक्त भाजपमध्ये आहे. याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. ज्या दिवशी निवडणुक होईल त्यादिवशी समजेल, असा इशारा संजय राऊतांनी सुजय विखे पाटील याना दिला.