एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केलेली का?, संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल

  • Written By: Published:
एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केलेली का?, संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल

Sanjay Raut On Eknath Shinde: सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून (Dussehra Gathering)ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना (CM Eknath Shinde) चांगलच फटकारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना केली होती का? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आहे. त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेपक्षाची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे संपवण्यात आली आणि पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. आता महाराष्ट्रात त्यांच्या हातात सत्ता आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती.मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी शिवसेना केली होती का?गेल्या वर्षी शिवाजी परी येथे दसरा मेळावा झाला होता. आणि तो यंदाही होणार आहे. असं विधान करत राऊतांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा फुटलेला गट नाही. शिंदेंचा फुटलेला गट आहे. आता राज्यातील हातात सत्ता आहे. दिल्लीची सत्ता आहे. यामुळे काही देखील कराल असं इथं चालणार नाही. गेल्यावर्षी दसरा मेळावा हा शिवतीर्थावर झाला आहे, त्यामुळे यंदाचा देखील तिथेच होणार असल्याचे त्यांनी थेट सांगितले आहे. तसेच खरी शिवसेना ही एकच आहे, जी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालत आहे. बाकी सर्व चोर, भुरटे आणि लफंगे आहेत.

मुंबईच्या स्वच्छतेवरून Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा; भाजप म्हणते जरा लाज वाटू…

यामुळे तुमच्याकडे सत्ता असल्याने मनमानी कारभार करणार का? असा प्रश्न संजय राऊतांनी यावेळी केल्याचे बघायला मिळत आहे. तसेच राहुल नार्वेकर घानाला जात होते आणि महाराष्ट्रात लोकशाही मरत आहे. अध्यक्ष वेळ काढूपणा करत आहेत त्यात नवीन काही नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली जबाबदारी ते पाळत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे नसल्याचे ते वारंवार दाखवत आहेत. आणि आता मला कळले की राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाला, असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube