BBC Documentary बोगस, TISS ने हे धंदे बंद करावेत

BBC Documentary बोगस, TISS ने हे धंदे बंद करावेत

नवी मुंबई : बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीतून (BBC Documentary) अपप्रचार आणि असत्य प्रसारित केले जात आहेत, असा आरोप करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीआयएसएसला (TISS) इशारा दिलाय.

बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरुन सध्या देशभरात गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातली होती. या बंदीनंतर अनेक विद्यापीठांमध्ये डॉक्यूमेंट्रीचे स्क्रिनिंग झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आता ‘बीबीसी’चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनेमध्येही (Tata Institute of Social Science) वाद रंगला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावरुन TSS ला इशारा दिला आहे.

आशिष शेलार म्हणाले, बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीतून अपप्रचार आणि असत्य प्रसारित केले जात आहेत. या डॉक्यूमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तरी देखील त्याची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनेमध्ये (TISS)स्क्रिनिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विशिष्ट धर्माची लोक आहेत.

हा महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पोलीसांना आम्ही सांगितले आहे की वेळीच कारवाई करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा प्रयत्न होतोय यावर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलाय.

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर बोलताना अशिष शेलार म्हणाले, अद्वय हिरे हे काही मोठे नेते नाहीत. ते

स्वार्थ पोटी गेले त्यांना आमच्या शुभेच्छा, अशी त्यांनी टीका अद्वय हिरेंवर केली आहे.

आदित्य ठाकरे हे उशिरा जागे झाले. चार दिवसांपूर्वी मी हे पत्र लिहिले आहे. मी पत्र लिहून मागणी केल्यामुळे आता त्यांना प्रश्न विचारले जातील म्हणून हे ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरे यांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे.

भारतीय जनता पार्टीने हा विषय स्वतः लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना यांना पत्र लिहिले आहे. वराती मागून आदित्य ठाकरे घोडे घेऊन आले आहेत. तुम्ही दिलेल्या परवानग्यांच्या बांधकामामुळे हे सर्व होत आहे, असा आरोप त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

दरम्यान, इंडिया टुडे-सी व्होटरचा सर्व्हे सध्या राज्यात चर्चेत आला आहे. यामध्ये निवडणूका झाल्यास मविआच्या 34 जागा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरुन विरोधक भाजपवर निशाणा साधत आहे.

आशिष शेलार यांनी असेच सर्व्हे उत्तर प्रदेशच्या, गुजरातच्या निवडणुकीपूर्वी काय सांगत होते. सर्व्हेत जगणारे पक्ष आता जागे झालेत. आम्ही सेवा करत जगू, असे प्रत्युत्तर दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube