मुंबईः यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. 88.58 लाख टन साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाज आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी कमी झालेले आहे. त्यात राज्यात काही भागात चांगला पाऊस झालेला नाहीत. त्यामुळे ऊस हा जनावरांचा चारा म्हणून वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदा ऊस गाळपासासाठी साखर कारखान्यांची sugar factory) पळापळ होणार आहे. कार्यक्षेत्राबाहेर ऊस गाळपासाठी आणण्याचा प्रयत्न कारखान्यांचा असणार आहे.
ललित पाटील प्रकरण लपवण्यामध्येच पोलीस प्रशासनाला इंट्रेस; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.
Ind vs Ban : स्टेडियम रिकामेच, मग तिकीटे गेली कुठे? संतप्त क्रिकेट चाहत्यांचा BCCI, MCA ला सवाल
साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले. गेल्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गाळप घेतले आहे. 105 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन 88.58 लाख टन एवढे होण्याचा अंदाज आहे. हा हंगाम 2022-23 मध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक आहे.
ठाण्यात मिळणार सर्वांना परवडणारी घरं! शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचे धडाकेबाज निर्णय…
कारखान्यांकडून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी टनामागे दहा रुपये घेणार
ऊसतोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून 10 रुपये टनामागे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला आहे. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतीगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.