“मनोहर पर्रीकरांसारखे तुम्हीही न सांगता शहरात फिरा”, पुणेकर महिलेचा थेट अजितदादांनाच सल्ला
तुम्ही सांगून येऊ नका गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जसे न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसच तुम्ही या.

Ajit Pawar Latest News : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे शहरात विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली. त्यांचा हा पाहणी दौराच होता. हडपसर मुंढवा भागातील पायाभूत सुविधांची पाहणी त्यांनी केली. केशवनगर मुंढवा या भागात नवीन पूल तयार केला जात आहे. या कामाचा आढावा घेतला. या कामाच्या गुणवत्तेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. कोंढवा भागातील वाहतूक कोंडी आणि हडपसर गाडीतळ चौकातील वाहतुकीची पाहणी केली. हा पाहणी दौरा सुरू असतानाच त्यांना स्थानिकांच्या प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला. यावेळी अजित पवार यांना स्थानिक महिलांना सल्ला दिला. या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मुंढवा, केशवनगरमधील काही सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडी या समस्या स्थानिकांनी अजित पवार यांच्यासमोर (Ajit Pawar) मांडल्या. तुम्ही सांगून येऊ नका गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जसे न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसच तुम्ही या असा सल्ला एका स्थानिक महिलेने अजितदादांना दिला.
रोहित पवारांचा अजित पवारांकडे कल, त्यांनी त्यांच्या पक्षात जावं; अंजली दमानियांचा खोचक टोला
तुम्ही पर्रीकरांसारखे न सांगता या..
तुम्ही यायच्या आधी आम्ही सगळ्या समस्या ऐकल्या आहेत. त्यांनी निवेदन दिलेले आहे. यामध्ये वेगवेगळ्या एजन्सी आल्या आहेत. पीएमसी आहे, पीएमआरडीए, आत्ताच नागरिकांना त्याचा देणंघेणं नाही. त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे आहेत, त्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत. त्या संदर्भामध्ये आमचं काम सुरू आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही त्या कामांमध्ये अधिक कशी गती देता येईल या कामांना प्रायोरिटी कशी देता येईल हे पाहतो असे अजित पवार नागरिकांना म्हणाले.
यावर येथील एक स्थानिक महिला म्हणाली, की आम्हाला खूप आशा आहेत. जसे पर्रीकर दिवसा फिरायचे ट्राफिक बघण्यासाठी तसेच तुम्ही कधीतरी ट्राफिकचा टाईम असतो, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, असं नाही की माहिती होऊ शकत नाही. यावर अजित पवार म्हणाले की पर्रीकर नेमके कोण? गोव्याचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रीकर.
ते जसे फिरायचे दिवसा ट्राफिक बघण्यासाठी तसे तुम्ही कधीतरी फिरून बघा आणि न सांगता व्हिजिट करत चला. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार असं नको व्हायला असे उत्तर महिलेने दिले. आम्ही येथे प्रश्न विचारायला आलेलो नाही. इथला सगळा परिसर ठीक व्हावा. सगळ्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी मी प्रयत्न करत आहे असे अजित पवार म्हणाले. यावर तसं नाही सर पण इथल्या समस्या पाहता येथे राहायचं की नाही असा प्रश्न आम्हाला पडलाय असे उत्तर महिलेने दिले.
अजित पवारांना भिडलेल्या अंजना कृष्णा कोण?, काय करतात आई-वडील?, कुठ अन् कसं झालं शिक्षण