ललित पाटील प्रकरण लपवण्यामध्येच पोलीस प्रशासनाला इंट्रेस; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

ललित पाटील प्रकरण लपवण्यामध्येच पोलीस प्रशासनाला इंट्रेस; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Prakash Ambedkar On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil)मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पाटीलने मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं, असा आरोप केला. त्यावरुन संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं. ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs Case)प्रकरणावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी पोलिसांवरच निशाणा साधला आहे. ललित पाटील प्रकरण लपवण्यामध्येच पोलीस प्रशासनाला इंट्रेस असल्याचा गंभीर आरोप यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Narayan Rane : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय, जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा; राणेंनी डिवचलं

आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे पुण्यामध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना ललित पाटील प्रकरणाबद्दल आपली प्रतिक्रिया विचारली. त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीतून मोठी नेक्सस बाहेर येणार आहे. यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

IND Vs BAN : चाहत्यांची धाकधूक वाढली; हार्दिक पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात हलवले

यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, यापूर्वी पोर्टबंदर येथे 20 हजार कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आलं. त्याबद्दल सांगण्यात आले की, अफगानचं ड्रग्ज आहे. तसे असेल तर तो 50 हजार कोटींचा मालक असला पाहीजे.

त्या संदर्भातली चौकशीही पुढे आली नाही. अशी प्रकरणं लपवण्यामध्येच पोलीस सहभागी आहेत. हा शोध घेण्याचा मुद्दा आहे. ललितने बोलावं, त्याला कुणी थांबवलं नाही. त्याचं मन त्यानं मोकळं करावं, असंही यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप असलेला ललित हा 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या घटनेला 15 दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागत नव्हता. मात्र, आज ललित पाटील याला गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली आहे. दरम्यान, यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैरी झडत होत्या. सरकारमधील काही मंत्र्यांची नावे या प्रकणात समोर आली होती. दरम्यान, ललित पाटीलला अटक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले ड्रग्ज फ्री महाराष्ट्र या संकल्पनेतून राज्यभरातील सरकारी यंत्रणा काम करत आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी नाशिकमधील या कारखान्याची माहिती मिळाली होती. या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. आता ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, मला काही गोष्टी कळल्या आहेत, पण त्याबद्दल नीट माहिती घेऊन योग्यवेळी मी बोलेन. पण, एवढंच सांगतो की, एक मोठी नेक्सस यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, असं फडणवीस म्हणाले.

मी पळालो नाही तर मला पळवण्यात आले, असं ललित पाटील यांने सांगितले. या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावं समोर आली होती. याविषयी फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, ललित पाटील काय बोलतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा आता पोलिस तपासातून जे नेक्सस बाहेर येईल, त्यावर लक्ष द्यायला हवं. पोलीस तपासात नेक्सस बाहेर आलं की, सगळ्यांची तोंड गप्प होतील. पोलीस सर्व तपास करत आहेत. दोषींना अजिबात सोडणार नाही. सगळ्यंवर कारवाई केली जाईल, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube