Sushma Andhare : माझा हा प्रश्न अमितशेठजींना.., सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सल्ला

Sushma Andhare : माझा हा प्रश्न अमितशेठजींना.., सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सल्ला

पुणे : जर उध्दव ठाकरे अपयशी होते तर भाजपचे नेते अमित शाह(Amit Shah) त्यांची पाऊले मातोश्रीच्या उंबरठ्यावर का झिजवत होते. हा प्रश्न आशिष शेलारांनी(Aashish Shelar) एकदा त्यांना विचारावा, असा सल्ला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare Press Conference) यांनी दिला आहे. सुषमा अंधारे आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आशिष शेलारांवर टीकेची तोफ डागली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, आमची आधी भाजपसोबत युती होती. तेव्हा आमच्या आमदारांची संख्या 53 इतकी होती. आता आमच्या आमदारांची संख्या 63 वर आहे. म्हणजे भाजपसोबत असताना आमची दहा लोकं कमी झाल्याने हे भाजपचं यश असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

तसेच पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, भाजपच्या हाती सर्वच केंद्रीय यंत्रणा आहेत. भाजपने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली. चौकशीनंतर काहीही निष्पन्न झालेलं नाही. याउलट दुसरीकडं भाजपने एकूण 15 नेत्यांना क्लीनचीट दिल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

क्लीनचीट दिलेल्यांमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड, मोहित कंबोज, मंगलप्रभात लोढा यांना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीनचीट दिल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलय. तसेच स्वत:ला देखील oदेवेंद्र फडणवीसांनी क्लिनचीट दिल्याचा टोला त्यांनी लगावलाय.

सुडाचं राजकारण करुन नेत्यांना त्रास देण्यासाठी आमच्याकडं किरीट सोमय्यांसारखे लोकं नाहीत, आम्ही अपयशी असतो तर आशिष शेलारांचे अमितशेठ मातोश्रीवर प्रतिनिधी का पाठवत होते, असंही त्यांनी म्हंटलंय.

दरम्यान, मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेऊन हे असे प्रकार भाजपकडून सुरु असून मातोश्रीवर भाजपचे नेते आपले प्रतिनीधी का पाठवत होते, हा प्रश्न आशिष शेलारांनी त्यांना विचारावा, असं खुलं आव्हानच त्यांनी यावेळी दिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube