BMC budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा, बजेटमध्ये मुंबईकरांना दिलासा

BMC budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा, बजेटमध्ये मुंबईकरांना दिलासा

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा २०२३-२४ साठीचा ५२ हजार ६१९.०७ कोटींचा मुख्य अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात सकाळी सादर करण्यात आला. (BMC budget 2023) यंदाचं हे बजेट तब्बल ५२ हजार ६१९ कोटींचे आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांकरिता भरीव तरतूद करण्यात आली. पालिका निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ करण्यात आली नाही.

मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा यंदाचा २०२२-२३ या वर्षीचा ३३७०.२४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिकेचे सहआयुक्त अजित कुमार यांनी शिक्षण समितीला सादर केला. कोरोनाच्या काळात गेल्या वर्षात शिक्षणावर पुरेसा खर्च झाला नसल्याने यंदाच्या शिक्षण विभाागाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली. कार्यानुभव शिक्षण आॉनलाईन, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली.

असंसर्गजन्य रोग कक्षासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सदर उपक्रमासाठी १२ कोटी इतकी तरतूद करण्यात आली.

राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना करण्यात येणार.

स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १.४० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली.

२०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये १२८७.४१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८०.१९ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली.

नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम आणि नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली, त्याबरोबरच प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एम. आर. आय. मशिन उभारण्यात येणार.

किटकनाशके व फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येणार. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ३५ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली.

शिव योग केंद्रांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसूली खर्चाकरिता ५ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube