Kasba Bypoll : भाजपकडून ही ५ नावे केंद्रीय समितीकडे, कोणाला मिळणार संधी?

  • Written By: Published:
Kasba Bypoll : भाजपकडून ही ५ नावे केंद्रीय समितीकडे, कोणाला मिळणार संधी?

पुणे : कसबा विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीसाठी नक्की कोणाला संधी मिळणार ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण यामध्ये आता एक नवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय केंद्रीय समितीकडून जाहीर केला जाईल. असं सांगण्यात येत आहे.

पाच नावे कोणाची ?

प्रदेश भाजपकडून पाठवण्यात आलेल्या पाच नावामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि कुणाल टिळक (Kunal Tilak) या दोन नावांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील भाजपचे नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांचीही नावे निवड समितीला देण्यात आली आहेत. येत्या तीन दिवसात भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडून निश्चित उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. असं सांगण्यात येत आहे.

पक्षाने संधी दिल्यास लढणार

“पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे” असं काही दिवसापूर्वीच मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केलं होतं. त्याचबरोबर मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची देखील चर्चा आहे. कुणाल टिळक सध्या भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. यामुळे भाजपने ही दोन्ही नावं केंद्रीय निवड समितीकडे पाठवली आहेत.

आमदाराच्या निधनाने जागा रिकामी झाली असेल तर ती निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये या परंपरेला बगल दिल्याने सर्वच पक्ष आता हि पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपकडून ही निवडणूक बिरविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत, परंतु आम्ही गाफील राहणार नाही असं खुद्द चंद्रकांत पाटीलच म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube