पर्यटन, कला आणि टेक्नॉलॉजीचे दर्शन महाराष्ट्रच्या स्टॉलवर, पाहण्यासाठी लोकांची गर्दी…

Maharashtra Stall : वेवज परिषदेच्या आज तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर एकाच वेळी अनेक ठिकाणी परिसंवाद, चर्चासत्र नृत्य, व्याख्यान आदी कार्यक्रम होताहेत. तर दुसरीकडे देशातील कित्येक राज्यांनी आपल्या राज्याची ओळख दाखवण्यासाठी स्टॉलची मांडणी केली आहे. येथे महाराष्ट्राच्या स्टॉलवर (Maharashtra Stall) पर्यटन, कला आणि टेक्नॉलॉजीचे दर्शन होत आहे, हे पाहण्यासाठी लोकांचे गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या स्टॉलची मांडणी केली आहे. येथे व्हिएफएक्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृती, पर्यटन, मनोरंजन याचे दर्शन होते. सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या स्टॉलवर डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुख्य जिल्हे, त्यांचे वैशिष्ट्ये आणि पर्यटन स्थळ यांची माहिती देण्यात आली आहे. यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील मैलाचा दगड ठरलेले चित्रपट ज्यांचे शूटिंग महाराष्ट्राच्या मातीत झाले आहे.
महाराष्ट्रात शूटिंग झालेल्या यशस्वी चित्रपटांची माहिती सागण्यात आली आहे. याचबरोबर सध्या एआयच्या जमान्यात वर्चुअल पोस्ट प्रोडक्शनच्या माध्यमातून शूटिंग महाराष्ट्रातही परदेशातील शूटिंगचा फिल येऊ शकतो. महाराष्ट्रातही वर्चुअल पोस्ट प्रोडक्शन शूटिंग होऊ शकते. असा प्रकारचा सेटअप म्हणजे पाठीमागे समुद्र आणि समोर वाळू असा सेट दाखवण्यात आला आहे. हा सेटअप पाहण्यासाठी आणि येथे फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
पाहून खूप आनंद झाला…
दुसरीकडे महाराष्ट्राच्या स्टॉलला दर्शन देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं येत आहेत. आज आम्ही कोल्हापूरवरून या परिषदेत आलो आणि इथे महाराष्ट्राच्या स्टॉल आवर्जून भेट दिली. इथे आल्यानंतर राज्यातील जी प्रमुख पर्यटन स्थळं आहेत, त्याची माहिती डिजिटलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि इथे वर्चुअल पोस्ट प्रोडक्शन कशाप्रकारे चालते. कशाप्रकारे शूटिंग केले जाते आणि जे परदेशात शूटिंग केले जाते.
एफडी पेक्षा जबरदस्त, ‘या’ बचत योजनेत करा गुंतवणूक, मिळणार 8.2 % व्याज
ते भारतात महाराष्ट्रात होऊ शकते. असे शूटिंग आम्ही करू शकतो. हे या महाराष्ट्राच्या स्टॉलच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे बघून फोटो काढून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही खूप फोटो काढले. आणि खूप धमाल केली… मस्ती केली… असे इथे आलेल्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.