लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हर डोस, दोघांचा मृत्यू; मुंबईत म्युझिक इव्हेंटसंबंधित पाच जण ताब्यात

drug overdose at Mumbai मुंबईमध्ये गोरेगाव येथे असलेल्या नेस्को सेंटरमध्ये एका म्युझिक इव्हेंट दरम्याने धक्कादायक घटना घडल्याचा समोर आलं आहे.

Drug Overdose At Mumbai

Two die of drug overdose at live concert; Five arrested of music event in Mumbai :राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आलेलं आहे. यामध्येच आता मुंबईमध्ये गोरेगाव येथे असलेल्या नेस्को सेंटरमध्ये एका म्युझिक इव्हेंट दरम्याने धक्कादायक घटना घडल्याचा समोर आलं आहे. यामध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

शनिवारी 11 एप्रिल रोजी मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को सेंटरमध्ये एक लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. यावेळी तब्बल तीन ते चार हजार तरुण-तरुणींची या ठिकाणी उपस्थिती होती. मात्र या ठिकाणी ड्रग्ज सेवनाचा प्रकार सुरू असल्याने ड्रग्जचा ओव्हरडोस झाला आणि जमुनालाल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ममतांना मोठा झटका! प्रचार करणाऱ्या आयपॅकच्या प्रमुखाला ईडीने उचललं

या मृतांमध्ये एक तरुणी आणि एक तरुण यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर एक विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास सुरू केला आहे. यामध्ये आता सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी नेस्कोचे व्हाईस प्रेसिडेंट यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.

follow us