World Economic Forum 2023 in Davos :सुपा इंडस्ट्रीयल पार्कसाठी जपान बँकेबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

  • Written By: Published:
World Economic Forum 2023 in Davos :सुपा इंडस्ट्रीयल पार्कसाठी जपान बँकेबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

World Economic Forum 2023 in Davos :मुंबईः सुपा एमआयडीसीत जपान इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येत आहे. या ठिकाणी गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये याबाबत चर्चा झाली आहे.

जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत. त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या ठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले आहे. येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली आहे.

या परिषदेच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४५ हजार कोटींचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत. या करारांमुळे गुंतवणूकदारांचा राज्यावरचा गाढा विश्वास असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये ब्रिटनच्या सर्वाधिक खपाच्या दि डेली मेलशी बोलताना सांगितले. या प्रसंगी त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या पायाभूत विकासाच्या कामांविषयी विस्तृत माहिती दिली.

मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक या विषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. पुढील 2 वर्षाच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या विकास आराखड्याची माहिती दिली.
सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री जोस्‍फाईन या देखील मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील सुविधांविषयी चर्चा केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube