पीएम मोदींची Man Ki Bat 100 कोटी जनतेने ऐकली, 23 कोटी लोक नियमित श्रोते

पीएम मोदींची Man Ki Bat 100 कोटी जनतेने ऐकली, 23 कोटी लोक नियमित श्रोते

100 crore people listen Modi’s Man KI Bat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मन की बात (Man KI Bat) या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाची लवकरच शतकपूर्ती होणार आहे. हा पीएम मोदी यांचा महिन्याचा कार्यक्रम आहे. मन की बात या कार्यक्रमाने रेडिओला ऑक्सीजन दिला. देशातील तब्बल 100 कोटी जनतेने पंतप्रधान मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ एकदा तरी ऐकला आहे. 23 कोटी लोक नियमितपणे ‘मन की बात’ ऐकतात. IIM रोहतकने (IIM Rohtak) ‘मन की बात’ वर अभ्यास केला आहे. यात ही माहिती समोर आली.

आयआयएमचे संचालक धीरज शर्मा आणि प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी सांगितले की, अभ्यासासाठी डेटा संकलन हिंदी तसेच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये केले गेले. मन की बात या मोदींच्या लोकप्रिय आणि बहुचर्चित कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. सीईओ द्विवेदी म्हणाले की, 22 भारतीय भाषा आणि 29 बोलींशिवाय 11 परदेशी भाषांमध्ये ‘मन की बात’ प्रसारित केली जाते.

96% लोकांना मन की बात बद्दल माहिती
IIM रोहतक ने केलेल्या या सर्वेत असं आढळून आले की देशातील 96% लोकांना मन की बात या कार्यक्रमाविषयी ठाऊक आहे. केवळ 4 टक्केच लोक या कार्यक्रमाविषयी अनभिज्ञ आहेत.
IIM रोहतक ने केलेल्या या सर्वेमध्ये पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांचा समावेश होता.
देशातीलस 65 टक्के लोक हे मन की बात हा कार्यक्रम हिंदी भाषेत ऐकतात, तर केवळ 18 टक्के जनता हा कार्यक्रम इंग्रजीत ऐकते.
17.6% लोक रेडिओवर मन की बात ऐकतात. 44.7% लोक टीव्ही ऐकतात आणि 36.6% लोक मोबाईलवर ऐकतात.
देशातील 19 ते 34 वयोगटातील 62% जनता हा कार्यक्रम मोबाईलवर ऐकते.
60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 3.2 % लोक टीव्हीवर मन की बात पाहतात.

लोक बदलले आहेत
देशातील 73 टक्के लोक हे देशाच्या एकूणच प्रगतीबद्दल आणि केंद्र सरकारच्या कामाबद्दल आशावादी असल्याचं समोर आलं आहे. देश योग्य दिशेने चालला आहे, असे त्यांना वाटते. या सर्वेक्षणानुसार, 63 टक्के लोकांचा सरकारबद्दल सकारात्मक दृष्टीकोन आहे, यावरून सर्वसामान्यांच्या सरकारबद्दलच्या भावनांचा अंदाज लावता येतो.
तर देशातील 59 टक्के नागरिकांना असं वाटतं की, त्यांचा सरकारवरील विश्वास हा पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. तर 55% लोकांनी सांगितले की ते देशाचे एक रिस्पॉन्स्पिबल नागरिक बनतील. देशातील अठ्ठावन टक्के श्रोत्यांनी सांगितले की या मन की बात या कार्यक्रमामुळं त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

10,003 लोकांवर सर्वेक्षण केले
या मन की बात कार्यक्रमाचे सर्वेक्षण करण्यासाठी तब्ब्ल 10,003 लोक नमुना म्हणून निवडले होते. या नमुना लोकांपैकी 60% पुरुष तर 40% महिला होत्या. हे लोक 68 वेगवेगळ्या गोष्टी करतात. यापैकी 64% अनौपचारिक आणि स्वयंरोजगार होते. 23% विद्यार्थी होते. आयआयएमचे संचालक धीरज शर्मा यांनी सांगितले की भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागातून डेटा घेण्यात आला आहे. सर्व प्रदेशातील सुमारे 2500-2500 लोकांशी बोलणे झाले.

Refinery Survey विरोधी आंदोलनात आणखी एकाला अटक, निषेधार्थ विविध संघटना मैदानात

पंतप्रधानांची मन की बात हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झाला होता. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. 30 मिनिटांचा हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाने शतकपूर्तीचा टप्पा गाठला असून 30 एप्रिल 2023 रोजी मन की बातचे 100 भाग पूर्ण होत आहेत.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube