Maharashtra-Karnataka: बेळगाव महानगरपालिकेत महापौर-उपमहापौरपदी ‘मराठी’ व्यक्ती
बेळगाव : गेल्या महिन्यांपासून तापलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर (Maharashtra-Karnataka demarcation) मराठी माणसांसाठी सखुद बातमी आहे. बेळगाव महापालिकेच्या (belgaum mahanagar palika) महापौर, उपमहापौर पदी मराठी व्यक्तींची निवड झाली आहे. आज या दोन्ही पदासाठी निवड झाली आहे.
बेळगाव (Belgaum) महापालिकेच्या महापौरपदी मराठी नगरसेवक शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर बेळगावमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.
बेळगाव महानगर पालिकेत सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. भारतीय जनता पक्षाकडे अनेक कन्नड संघटनांनी कन्नड उमेदवार महापौरपदी द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु भाजपने मराठी उमेदवारालाच दोन्ही पदे देत कन्नड संघटनांना धक्का दिला. कर्नाटक भाजपने केलेल्या या खेळीचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे.
भाजप कोअर कमिटीच्या घोषणेनंतर महापौरपदी भाजपच्या शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड केली. सोमवारी निवडणूक असल्यामुळे पालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी भगवा फेटा बांधला होता. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी दिल्या.
महापौर पदासाठी सारिका पाटील, शोभा सोमना आणि वाणी जोशी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तर उपमहापौर पदासाठी वैशाली भातकांडे यांनी अर्ज भरला होता. महापौरपदी शोभा सोमानेचे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव निश्चित झाले.
भाजपच्या या खेळीनंतर आता काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता कोण असणार हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. काँग्रेसनेही भाजप प्रमाणे मराठी उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे.