विमान प्रवास ठरला डोकेदुखी! फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून केला प्रवास
Mumbai-Bangalore flight : स्पाइसजेट एअरलाइन्सच्या (SpiceJet Airlines) मुंबई-बंगळुरू फ्लाइटमधील (Mumbai-Bangalore flight) एक प्रवासी 1.30 तास टॉयलेटमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तांत्रिक बिघाडामुळे टॉयलेटचे गेट न उघडल्याने प्रवाशाला बाहेर पडता आले नाही. विमान बंगळुरूच्या केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा ग्राउंड स्टाफने टॉयलेटचा दरवाजा तोडून प्रवाशाला बाहेर काढले. लँडिंगच्या वेळीही टॉयलेटमध्ये अडकल्यामुळे पीडित मुलगी खूपच घाबरली होती.
विमानाच्या टॉयलेटमध्ये प्रवाशी अडकल्याची ही घटना फ्लाइट क्रमांक SG-268 मध्ये घडल्याचे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले आहे. स्पाईसजेटच्या या विमानाने मंगळवारी (16 जानेवारी) पहाटे 2 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण केले होते. शौचालयात अडकलेल्या प्रवाशीची माहिती अद्याप समोर आली नाही. स्पाइसजेटनेही या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केबिन क्रूनेही टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला नाही.
विमानात प्रवासी कसा अडकला?
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेक ऑफ करताच प्रवाशाने सीटबेल्ट उघडला आणि तो टॉयलेटमध्ये गेला. मात्र टॉयलेटच्या दारात बिघाड झाल्याने तो आत अडकला होता. प्रवाशाने टॉयलेटच्या आतून क्रू मेंबर्सना ते अडकल्याचा इशाराही दिला. यानंतर क्रू मेंबर्सनी घाईघाईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तरीही दरवाजा उघडला नाही. यानंतर प्रवासी 1.30 तास टॉयलेटमध्ये अडकून राहिला.
Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवा, थेट हायकोर्टात याचिका
विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकल्याची ही घटना फ्लाइट क्रमांक SG-268 मध्ये घडल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली आहे. स्पाईसजेटच्या या विमानाने मंगळवारी (16 जानेवारी) पहाटे 2 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण केले होते. शौचालयात अडकल्याची प्रवाशाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्पाइसजेटनेही या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केबिन क्रूनेही टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला नाही.
Mahua Moitra : ‘सरकारी बंगला तत्काळ सोडा, नाहीतर’.. खासदारकी गेलेल्या मोईत्रांना केंद्राची नोटीस
दरवाजा तोडून प्रवाशाला बाहेर काढले
स्पाइसजेटचे विमान मंगळवारी पहाटे 3.42 वा. बंगळुरू विमानतळावर उतरले. विमान उतरताच अभियंते तेथे पोहोचले आणि दरवाजा तोडून प्रवाशाला टॉयलेटमधून बाहेर काढले. प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, गुदमरल्यामुळे पीडित प्रवाशाचा धक्का बसला होता.