‘अब देश जवाब देगा’, राहुल गांधींची घोषणा, 1 नोव्हेंबरला दिल्लीत ‘व्होट बचाओ–देश बचाओ’ रॅली

Rahul Gandhi: मतदार यादीतून लोकांची नावे वगळण्यात आली, नियम-कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या चालवण्यात आल्या,

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rahul Gandhi

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कथित ‘मतचोरी’ आणि मतदार यादीतून मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपला घेरण्यासाठी रणनिती आखलीय. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘वोट बचाओ–देश बचाओ’ जनमार्च आणि मेगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेय. या रॅलीत सहभागी होण्यासाठी त्यांनी देशवासीयांना एक आवाहन केले आहे. ‘मतचोरी कोणत्याही परिस्थितीत गप्प बसून सहन केली जाणार नाही. आता देश याचे उत्तर देईल,’ असा राहुल गांधी यांनी दिलीय.
Ab desh jawab dega
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून हे आवाहन केले. मतदार यादीतून लोकांची नावे वगळण्यात आली, नियम-कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या चालवण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवर आवाज उठवत लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


‘मत तुमचे आहे, लढाईही तुमचीच’; राहुल गांधींचे नागरिकांना आवाहन

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमधून विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, तरुण आणि व्यापाऱ्यांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीची चिंता असलेल्या प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीला येण्याचे आवाहन करताना राहुल गांधी यांनी, ‘मत तुमचे आहे, लढाईही तुमचीच आहे,’ असा संदेश दिला. मतदार यादी आणि मतदानाच्या अधिकाराशी संबंधित मुद्द्यांवर जनतेचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न या आवाहनातून करण्यात आला आहे.


1 नोव्हेंबरला रामलीला मैदानावर जनमार्च आणि मेगा रॅली

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये आंदोलनाची तारीख आणि ठिकाणही स्पष्ट केले आहे. त्यानुसार, ‘वोट बचाओ–देश बचाओ’ जनमार्च आणि मेगा रॅली 1 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. लोकशाहीशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हे व्यासपीठ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोस्टच्या शेवटी राहुल गांधी यांनी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर उपरोधिक टीकाही केली. या कार्यक्रमाचा प्रचार केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, पुढील सात दिवसही याच उत्साहाने आणि समर्पणाने प्रचार सुरू ठेवावा, असा टोला त्यांनी लगावला.

follow us