तुमची पदवी जाहीर कर मग माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करचतो, अभिजीत दिपके यांचं पंतप्रधानांना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची शैक्षणिक पदवी आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत.

News Photo   2026 08 03T135848.487

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके (Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीच्या मुद्द्यावरून थेट आव्हान दिले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची शैक्षणिक पदवी आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत. त्यांनी तसे केल्यासच मी माझ्या शैक्षणिक कर्जाची कागदपत्रे, शिष्यवृत्तीचे पत्र तसेच परदेशातील शिक्षणाचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करेन,” असे दिपके यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. “ईडी किंवा सीबीआय पाठवत असाल, तर त्यासोबत पंतप्रधानांची पदवीही पाठवा, असा टोला लगावत त्यांनी पंतप्रधानांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी केली.

कायद्याचा पेपरफुटी रोखण्याऐवजी त्यानंतरच्या कारवाईवरच भर; सीजेपीचे अभिजीत दिपकेंना वेगळाच संशय

महत्वाची बैठक होणार

येत्या 5 तारखेला अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील घरी कॉकरोच जनता पार्टीची बैठक होत आहे. याबाबत अभिजीत दिपके यांना विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी म्हटले की, 5 तारखेला होणाऱ्या बैठकीला कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आणि आंदोलन यशस्वी करण्यात प्रमुख भूमिका बजावणारे काही लोक उपस्थित असतील.

कॉकरोच जनता पार्टीने भविष्यात काय करायचं, संघटना कशी वाढवायची, पुढचा रोडमॅप काय असेल, यावर चर्चा होणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते आणि इतर लोक मला भेटायला येत आहेत. पण आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडले गेलेलो नाहीत. गरज पडल्यास मी पुन्हा जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करेन, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले.

follow us