Adani Group मोठा निर्णय! गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी परत करणार, कारण हे सांगितलं

  • Written By: Published:
Adani Group मोठा निर्णय! गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी परत करणार, कारण हे सांगितलं

मोठ्या घडामोडीनंतर अदानी समूहाने (Adani Group) एफपीओ रद्द केला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, बाजारातील अस्थिरता पाहता कंपनीच्या बोर्डाने एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही एफपीओकडून मिळालेली रक्कम परत करणार आहोत आणि व्यवहार समाप्त करणार आहोत.

एफपीओ म्हणजे काय ?

फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) हा कंपनीसाठी पैसे उभारण्याचा एक मार्ग आहे. स्टॉक मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स ऑफर करते. हे शेअर्स सध्या बाजारात असलेल्या शेअर्सपेक्षा वेगळे असतात.

फॉलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) मध्ये वीस हजार कोटी रुपये अडाणी ग्रुप मध्ये गुंतवण्यात आले होते मात्र ऑफर प्राईस पेक्षा अदानी इंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये आज तब्बल 36 टक्के घट झाली याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला असता तो टाळण्यासाठी अडाणी यांनी हे पैसे गुंतवणूकदारांना परत देण्याचा निर्णय आज रात्री उशिरा घेतला आहे.

क्रेडिट स्विस या कंपनीने अदानी इंटरप्राईजेसचे बॉंड हे कर्ज देण्यासाठी स्वीकारणार नसल्याची घोषणा आज केली होती त्यामुळे अडाणी ग्रुपच्या सर्व शेअरमध्ये मोठी पडझड झाली त्याचा फटका खाजगी आणि सरकारी बँका यांनाही बसला. अदानी ग्रुपने हे 20000 कोटी रुपये आपले कर्ज कमी करण्यासाठी उभारले होते त्यामुळे ही रक्कम त्यांच्यासाठी महत्त्वाची होती.

हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यापासून अदानी उद्योग समूह मोठ्या अडचणीत आला आहे. एफ पी ओ पूर्ण क्षमतेने म्हणजे वीस हजार कोटी रुपयांच्या जमा झाल्याने अदानी उद्योग समूह या अडचणीतून बाहेर पडल्याची चर्चा बाजारात होती मात्र क्रेडिट स्विस च्या निर्णयानंतर पुन्हा या उद्योग समूहासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube