Bharat Jodo Yatra : नेहरूंनंतर राहुल गांधींनी लाल चौकात फडकावला तिरंगा
जम्मू : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली. राहुल गांधी यांनी तेथे ठरल्याप्रमाणे ध्वजारोहण केले. तिरंगा फडकवताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. तसेच चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. लाल चौकाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे आणि शहराच्या मध्यभागी बहुस्तरीय सुरक्षा गराडा घालण्यात आला आहे. राहुल गांधी आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत.
देशात द्वेषाचे आणि फाळणीचे वातावरण आहे.
लाल चौकातील ध्वजारोहण समारंभानंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले, “लाल चौकातून भारतीय ध्वज फडकवून आम्ही दाखवून दिले आहे की, ना द्वेष, ना फूट, ना फाटाफूट, या देशात प्रेमआणि बंधुता चालेल. बेरोजगारी आणि महागाईचे उत्तर मोदी सरकारला द्यावेच लागेल. आज देशात द्वेषाचे आणि फाळणीचे वातावरण आहे. देशाच्या पंतप्रधानापेक्षा 140 कोटी जनता मोठी आहे, मग ते मोदी असो वा अन्य कोणी… हे पाहून, लोक या देशाचा ध्वज आहेत. आज आपण देशाच्या पुनर्मिलनाची घोषणा करत आहोत.
एका प्रश्नाच्या उत्तरात सुरजेवाला म्हणाले, “मला वाटते की, पंतप्रधानांनी त्यांच्या मनातील चोर पाहिला असता, तर सत्य समोर आले असते. हा देश रोज स्मशानभूमी आणि कबरस्तानमध्ये तोडला जात आहे. रोजगार ता हा देश चालेल .जेव्हा गॅस सिलिंडर 400 रुपयांचा असेल, तेव्हा देश चालेल. जेव्हा डाळ 60 रुपयांची असेल, तेव्हा देश चालेल. जेव्हा बेरोजगारांना काम मिळेल खायला अन्न मिळेल तेव्हा हा देश चालेल.
लाल चौकानंतर ‘भारत जोडो यात्रा’ शहराच्या बुलेवर्ड भागातील नेहरू पार्कच्या दिशेने मार्गस्थ होईल, जिथे ३० जानेवारीला ४,०८० किमीच्या पदयात्रेचा समारोप होईल. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली हि यात्रा देशभरातील 75 जिल्ह्यातून गेली आहे.
सोमवारी, राहुल गांधी श्रीनगरमधील एमए रोडवरील काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवतील, त्यानंतर एसके स्टेडियममध्ये जाहीर सभा आयोजित केली जाईल. या जाहीर सभेसाठी 23 विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.