मोठी बातमी : परिस्थिती पुन्हा बिघडली! इराणमधून तात्काळ बाहेर पडा; दुतावासाच्या भारतीयांना सूचना

America Iran War इराणमधील भारतीय दुतावासाने इराणमधील भारतीयांना तात्काळ इराणमधून बाहेर पडण्याचे सांगितले आहे.

America Iran War

America Iran War Leave Iran immediately Embassy advises Indians : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. रविवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागत थेट हल्ला चढवला, तर लेबनानमधील हिजबुल्लाह संघटनेनेही मिसाइल आणि ड्रोनच्या माध्यमातून इस्रायलला लक्ष्य केले. या अचानक झालेल्या हल्ल्यांमुळे जगावर पुन्हा संकट आणखी गडद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इराणमधील भारतीय दुतावासाने इराणमधील भारतीयांना तात्काळ इराणमधून बाहेर पडण्याचे सांगितले आहे.

दुतावासाच्या भारतीयांना सूचना

इराण आणि आखाती देशांमधील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये प्रवास टाळण्याचा यापूर्वी देण्यात आलेला सल्ला भारतीय दूतावासाने पुन्हा एकदा सर्व भारतीय नागरिकांना दिला आहे. त्याचबरोबर सध्या इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनीही उपलब्ध वाहतूक सुविधांचा वापर करून शक्य तितक्या लवकर देश सोडावा, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानमधील Mehrabad International Airport आणि पश्चिम इराणमधील Kermanshah International Airport यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. प्रदेशातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी इस्रायलने तेहरानसह इस्फहान आणि तब्रीझ या शहरांवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या नियोजनाबाबत अद्ययावत माहिती घेत राहण्याचे तसेच अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

इराण-इस्रायल संघर्ष आणखी तीव्र

वृत्तांनुसार, इराणकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात आल्यानंतर Jerusalem तसेच Ramallah आणि Dead Sea परिसरात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक कारवायांचे दावे करण्यात येत आहेत. दरम्यान, येमेनमधील बंडखोर गटानेही इस्रायलमधील Jaffa परिसरातील संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us