ब्रेकिंग : ट्रम्प यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! इराणवरील हल्ले ५ दिवसांसाठी स्थगित; युद्ध थांबणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धासंबंधी मोठी घोषणा केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी ‘Truth Social’ वर पोस्ट केले आहे की, “मला हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण या देशांमध्ये, मध्यपूर्वेतील आपल्या परस्पर शत्रुत्वाचा संपूर्ण आणि निर्णायक निपटारा करण्याबाबत अत्यंत चांगल्या आणि फलदायी चर्चा झाल्या आहेत. या सखोल, तपशीलवार आणि विधायक चर्चांचा ज्या संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील, एकूण सूर आणि स्वरूप लक्षात घेऊन, मी ‘युद्ध विभागाला’ (Department of War) असे निर्देश दिले आहेत की, इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर केले जाणारे कोणतेही आणि सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांच्या कालावधीसाठी स्थगित करण्यात यावेत अर्थात, हे स्थगितीकरण सध्या सुरू असलेल्या बैठका आणि चर्चांच्या यशावर अवलंबून असेल.
ट्रंप यांच्या या पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये असलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहीम रेजाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “लढाई सुरूच आहे आणि ही शत्रूसाठी आणखी एक पराभव आहे. ट्रंप आणि अमेरिका पुन्हा एकदा पराभूत झाले आहेत.” इराणकडून आलेली ही प्रतिक्रिया ट्रंप यांना उत्तेजित करणारी आहे. इराणने हे स्पष्ट केले आहे की पडद्यामागे किंवा प्रत्यक्षरित्या अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ट्रंप यांचे हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. इराण हे पाऊल अमेरिकेने आपल्यासमोर गुडघे टेकले असल्याचे सांगत आहे. या घडामोडींमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली असून, इराणच्या शेजारील देशांमध्येही काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे.
Video : युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो, कोरोना संकटाप्रमाणे तयार राहावे लागेल : मोदी
दुसरीकडे, अमेरिका जहाज वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी अमेरिकन मरीन दल इराणच्या बेटांवर किंवा किनारी भागांवर उतरू शकते. इस्रायलनेही संकेत दिले आहेत की युद्धादरम्यान जमिनीवरील मोहिमेची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेंको यांनी सांगितले की रशिया आम्ही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सतत संपर्कात आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडल्यास इतरही देश या युद्धात उतरण्याची शक्यता आहे.