आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या काकांना अटक
Vivekananda Reddy murder case: माजी खासदार विवेकानंद रेड्डी हत्येप्रकरणी सीबीआयने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांचे काका वायएस भास्कर रेड्डी (YS Bhaskar Reddy) यांना अटक केली आहे. भास्कर रेड्डी यांची अटक ही 48 तासांत सीबीआयने केलेली दुसरी अटक आहे. यापूर्वी तपास यंत्रणेने कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांचा जवळचा सहकारी गज्जला उदय कुमार याला अटक केली होती.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी 15 मार्च 2019 रोजी रात्री विवेकानंद रेड्डी यांच्या पुलिवेंदुला येथील निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येवेळी ते घरी एकटेच होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात होता, परंतु जुलै 2020 मध्ये तो सीबीआयकडे सोपवण्यात आला.
उद्या एखादा गँगस्टर… अतिक अहमदच्या हत्येनंतर भाजप नेत्याचं आधीचं ट्विट चर्चेत!
वायएस भास्कर रेड्डी यांच्याविरुद्ध कलम 120 (बी) (षडयंत्र), 302 (हत्या), 201 (पुराव्यासह छेडछाड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी हे कडप्पा लोकसभेतून विद्यमान अविनाश रेड्डी यांच्याऐवजी स्वत:साठी किंवा वायएस शर्मिला (मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण) किंवा वायएस विजयम्मा (जगन मोहन रेड्डी यांची आई) यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचे तिकीट मागत आहेत.