Kapil Sibal : “आया-गया राम और सियाराम, दोनो…” सुनावणी संपताच कपिल सिब्बल यांचं सूचक ट्विट
राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद चालू होता. काल न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटवरून अनेक अर्थ काढले जात आहेत.
कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये “पक्षांतर, आया गया राम आणि सिया राम, दोघे एकत्र होऊ शकत नाही” असं ट्विट सिब्बल यांनी केलं आहे. सिब्बल यांच्या या ट्विटनंतर त्यांच्या ट्विटचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल नक्की काय लागेल याची देखील चर्चा रंगली.
Defection
aaya gaya ram
aur
Siya Ram
Dono ikkatthe nahin ho sakte
— Kapil Sibal (@KapilSibal) March 17, 2023
भावनिक आवाहन करत सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला
कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवताना त्यांनी भावनिक आवाहन करत युक्तिवाद केला. या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे काही वेगळे प्रसंग आले. पण त्याच प्रकरणाइतकंच हे प्रकरण महत्त्वाचं आणि प्रभाव पाडणारं आहे.
Sibal: This is an equally significant case. It’s a moment in the history of this court where the future of democracy will be determined.#SupremeCourtOfIndia #ShivSenaCrisis #Maharashtra
— Live Law (@LiveLawIndia) March 16, 2023
हा या न्यायालयाच्या इतिहासातला एक असा क्षण आहे, जेव्हा लोकशाहीचं भवितव्य ठरवलं जाणार आहे. मला याची खात्री आहे, की या न्यायालयानं जर मध्यस्थी केली नाही, तर आपण, आपली लोकशाही धोक्यात येईल. कारण कोणतंच सरकार अशा प्रकारे टिकू दिलं जाणार नाही. या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो.