लखनौच्या टॉप शाळेत शिकलेल्या असदची कशी झाली गुन्हेगारी जगात एंट्री

लखनौच्या टॉप शाळेत शिकलेल्या असदची कशी झाली गुन्हेगारी जगात एंट्री

Asad Ahmed Encounter :  उत्तर प्रदेशमधील माफिया डॉन अतीक अहमदचा मुलगा असद अहमदचा आज ( 13 एप्रिल 2023 ) रोजी एनकाउंटर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या झाँसी येथे हा एनकाउंटकर करण्यात आला आहे. उमेस पाल हत्याकांडानंतर पोलिस त्यांच्या शोध घेत होती. आता पोलिसांना त्याचा एनकाउंटकर केला आहे. पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते.

पोलिसांनी असद अहमद व त्याच्यासोबत असलेल्या शूटर गुलाम या दोघांचा खात्मा केला आहे. या दोघांवर 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या कारवाईमध्ये पोलिसांना त्यांच्याजवळ विदेशी हत्यारं सापडली आहेत.

अतीक अहमदच्या तिन्ही मुलांमध्ये असद हा सगळ्यात सर्वात छोटा होता. तो लखनौच्या टॉप शाळेमध्ये शिकला होता. याच वर्षी त्याने 12 वी पास केली होती. असद हा अभ्यासामध्ये अतिशय हुशार असल्याचे कळते आहे. त्याला कायद्याच्या अभ्यासासाठी परदेशात देखील जायचे होते. परंतु कुटूंबाच्या क्रिमिनल रेकॉर्डमुळे त्याचा पासपोर्ट क्लिअर होऊ शकला नाही.

Asad Ahemad Encounter : मुलाच्या एन्काउंटरची बातमी समजताच कोर्टात ढसाढसा रडला अतिक अहमद

असदचे शालेय शिक्षण शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून बारावीपर्यंत झाले. बारावी उत्तीर्ण होण्यापूर्वीच त्याला परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पडू लागले. जेव्हा त्याने हे त्याच्या आई शाइस्ताला सांगितले तेव्हा तिने त्यास होकार दिला. गेल्या वर्षी असद इंटरची परीक्षा ८५ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्जही केले. त्यात बर्मिंगहॅमसह सात अन्य विद्यापीठांचा समावेश होता.

असदचे दोन्ही भाऊ जेलमध्ये गेल्यानंतर त्याने त्यांच्या गँगची जबाबदारी सांभाळली व यानंतरच त्याची गुन्हेगारी जगात एंट्री झाली. असदचे मोठे भाऊ उमर व अली यांनी एनकाउंटच्या भितीने पोलिसांकडे सरेंडर केले होते. दरम्यान  यापूर्वी उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमद आणि त्याच्या भावाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

यावेळी आपला मुलगा असदच्या एन्काउंटरची बातमी समजताच माफिया अतिक अहमद कोर्टरूममध्ये ढसाढसा रडल्याचे सांगितले जात आहे. मुलाची बातमी समजल्यानंतर अतिक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो न्यायालयातच ढसाढसा रडू लागला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube