‘देश मोठा की तुमचं हिंदुत्व?’, खासदार ओवेसींचा थेट पंतप्रधान मोदींना सवाल

‘देश मोठा की तुमचं हिंदुत्व?’, खासदार ओवेसींचा थेट पंतप्रधान मोदींना सवाल

Asaduddin Owaisi On Narendra Modi : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर लोकसभेत गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू झाली आहे. आसामचे खासदार गौरव गोगाई यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आजही अविश्वास ठरावावर चर्चा सुरू आहे. यावेळी AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी देश मोठा की हिंदुत्व? असा सवाल पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) केला. (Asaduddin Owaisi On Narendra Modi they asked The country is big or your Hindutva)

काल मणिपूर मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावर आज आज संसदेत बोलतांना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, आमचे गृहमंत्री काल क्विट इंडियाबद्दल बोलत होते. जर यांना ठाऊक असतं की, क्विट इंडियाचा नारा हा एका मुस्लिम व्यक्तीने दिला होता. तर तो नाराही त्यांनी नाकारला असता. इतका मुस्लिम द्वेष सरकार करतं. क्विट इंडियाचा नारा युसुफ मेहरअली यांनी  दिला होता, असं ओवैसी म्हणाले.

AIIMS मध्ये नर्सिंग ऑफीरस पदांसाठी भरती, 25 ऑगस्टपासून करू शकता अर्ज 

पुढं बोलतांना ओवैसी यांनी सांगिलतं की, जर या देशात तुम्हाला क्विट इंडियाचा नारा द्यायचा असेल चायना क्विंट इंडिया असा द्यावा लागेल. गोरक्षक मोनू मानेसर ज्याला तुम्ही मोनू डार्लिंग केलं, त्याच्या विरोधात क्विट इंडियाचा नारा द्यावा लागेल. तुम्ही (केंद्र सरकार) ज्या द्वेषाचं राजकारण करत आहात. त्यामुळे देशाचं नुकसान होईल. मला पंतप्रधानांना विचारायच की देशापेक्षा हिंदुत्व महत्त्वाचे आहे का? याच उत्तर पंतप्रधानांनी द्यालं. जर तुम्ही अन्यायाविरोधात आवाज उचलला नाही, तर तुमचं राजकारण चालणार नाही, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

पुढं त्यांनी सांगिलतं की, मोदी आणि त्यांचे सहकारी हे पसमंदा मुस्लिमांबद्दल बोलतात पण मंत्रिमंडळात एकही पसमंदा मुस्लिम मंत्री नाही. देशाला द्वेषाच्या दिशेने ढकलू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube