कोणत्या राज्यात भाजप आणि काँग्रेसची सत्ता? चार राज्यांच्या निकालाने चित्र बदलले

कोणत्या राज्यात भाजप आणि काँग्रेसची सत्ता? चार राज्यांच्या निकालाने चित्र बदलले

Assembly Election Result : 2023 च्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा (Assembly Election Result) निवडणुकांपैकी 4 राज्यांच्या निकालांनुसार भाजप (BJP) तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे, तर तेलंगणातील जनतेने काँग्रेसचा (Congress) हात धरला आहे. याशिवाय मिझोरामचे निकाल उद्या म्हणजेच सोमवारी (4 डिसेंबर) येणार आहे.

या तीन राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर 12 राज्यांमध्ये ते स्वबळावर सत्तेत असतील. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेस तीन राज्यांत स्वबळावर सत्तेत असेल. कर्नाटक, हिमाचल प्रदेश ही अशी राज्ये आहेत जिथे काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. तेलंगणाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत पण चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

कोणत्या राज्यात भाजपचे सरकार?
केंद्रात सत्तेत असलेला भाजप उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तेत आहे. आज सुरू असलेल्या मतमोजणीनुसार मध्य प्रदेशात भाजपने सत्ता कायम राखली आहे. राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. मात्र, हरियाणात भाजपची जननायक जनता पक्षाशी (जेजेपी) युती आहे. याशिवाय भाजप महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांतील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.

तेलंगणाच्या विजयाचा जादूगार ‘रेवंत रेड्डी’; मुलीच्या लग्नासाठी मिळला होता फक्त 12 तासांचा जामीन

काँग्रेसचे कोणत्या राज्यात सरकार?
कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश काँग्रेस स्वबळावर सत्तेवर आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करत आहे. तेलंगणात काँग्रेसने सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) चा पराभव करत विजयाच्या मार्गावर आहे. काँग्रेस बिहार आणि झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचा देखील भाग आहे. तर तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चा सहयोगी आहे. मात्र राज्य सरकारचा भाग नाहीत.

Election Results 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ फुललं! देशभरात कोणत्या राज्यांत भाजपचं सरकार?

दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपनं जवळपास विजय मिळवला आहे. लोकसभेपूर्वी सेमीफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजपसाठी पुन्हा एकदा मोदी फॅक्टरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदानापूर्वी मोदींनी तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आक्रमक भाषणं देत सभा गाजवल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्याऐवजी भाजपने संपूर्ण निवडणूक पीएम मोदींच्या चेहऱ्यावर लढवली आणि लोकांना कमळावर मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम तीन राज्यातील निकालात दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube