पाच तासांत अवघे चाळीस रुपये कमाई, रिक्षाचालकाला रडू कोसळले !

  • Written By: Published:
पाच तासांत अवघे चाळीस रुपये कमाई, रिक्षाचालकाला रडू कोसळले !

बंगळुरू: कर्नाटकमधील काँग्रेस (Karnataka Goverment) सरकारने निवडणुकीत जाहीर केलेल्या मोफत योजना लागू केल्या आहेत.त्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास ही एक योजना आहे.या मोफत योजनेचा परिणाम आता दिसू लागला आहे. कर्नाटकमधील रिक्षाचालकांना ( Auto Driver) याचा फटका बसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ बंगळुरू शहरातील आहे. (auto-driver-breaks-down-40-rupees-earn-in-5-hour)

या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक एका स्थानिक न्यूज चॅनेलला आपली दिवसभराची कमाई किती झाली हे सांगत आहे. हे सागत असताना त्याला रडू कोसळले आहे. पाच तास रिक्षा चालविल्यानंतर त्याची कमाई अवघी चाळीस रुपये झाली असल्याचे तो सांगत आहे.त्याने वीस रुपयांच्या दोन नोटाही ही दाखविल्या आहेत.

Senthil Balaji: तामिळनाडूत मुख्यमंत्री-राज्यपाल वाद टोकाला; भ्रष्टाचारी मंत्री परस्पर बडतर्फ

सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत ही कमाई झाले असल्याचे तो रिक्षाचालक सांगत आहे. येथील स्थानिक न्यूज चॅनेल पब्लिक नेक्स्टशी हा रिक्षाचालक बोलत होता. झेव्हिअर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. परंतु हा व्हिडिओ कधीचा आहे हे मात्र दाखविण्यात आलेले नाही.

Sharad Pawar : …तर मी मोदींसाठी मैदानात उतरणार; पवारांचा मास्टर स्ट्रोक

हा व्हिडिओ लोकांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. काहींनी रिक्षाचालकाचे बाजूने मत मांडले आहे.काहींनी मात्र रिक्षाचालकांच्या प्रवासांच्या जुन्या वागण्यावर बोट ठेवले आहे. थोड्या अंतरासाठी रिक्षाचालक हे दोनशे रुपये घेत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळत असल्याची एकाची प्रतिक्रिया आहे.

काँग्रेसच्या योजना
काँग्रेस सत्तेत आल्यास 200 युनिट मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवासाचे आश्वासन देण्यात आले आहे.तसेच बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्यातील मोफत वीज व महिलांसाठी मोफत बस प्रवास ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube