31 मार्चपर्यंत देशातील बॅंका रविवार आणि शनिवारीही सुरूच राहणार, आरबीआयचा निर्णय
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-2023 संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशातच आता रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank) देशातील बॅंकासाठी एक महत्वाची सुचना जारी केली आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाची गणणा आणि सर्व रेकॉर्ड्स तयार करण्यासाठी देशातील बॅंकांना 31 मार्चपर्यंत कोणतीही सुट्टी न देण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळं आता शनिवार आणि रविवारी देखील बॅंका सुरूच असणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे बॅंक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे.
31 मार्च पर्यंत देशातील बॅंक सुरू राहणार असल्या तरी या दिवशी ग्राहकांची बॅंकातील कोणतीच कामे होणार नाहीत. मात्र, धनादेश बॅंकेच्या शाखेत जमा करता येतो. तसेच या दिवशी ऑनलाईन बॅंकिंग सेवाही सुरू राहणार आहे. मार्च संपल्यानंतर 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या दिवशी बॅंकाना सुट्टी देण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याचे सुरूवातीचे दोन दिवस बॅंकाना सुट्टी असल्यानं ग्राहकांच्या आर्थिक कामाचा खोळंबा होणार आहे.
RBI चे काय निर्देश आहेत
चालू आर्थिक वर्ष संपत असतांना सर्व कामकाज नियोजित वेळेआधी संपवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या पत्रात म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत व्यवहार सुरू राहतील. तसेच, 31 मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी RBI चे डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल.
‘असा कृषीमंत्री मिळाला हे आपलं भाग्यच’.. मंत्री सत्तारांच्या रात्रीच्या दौऱ्यावर आव्हाडांचा खोचक टोला..
दरम्यान, 31 मार्च पर्यंत बॅंका सुरू राहणार असल्या तरी या कार्यकाळात बॅंकेत ग्राहकांची कोणतीच कामे होणार नाही. फक्त ग्राहकांना धनादेश बॅंकेत जमा करता येणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयाचा ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगितलं. त्यामुळे ग्राहक आपले आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन बॅंकिंगच्या माध्यमातून करू शकणार आहेत.
या सर्व गोष्टी 31 मार्च पूर्वी करा
31मार्चपूर्वी आधार पॅनशी लिंक करा. तुम्ही असे न केल्यास 1 एप्रिलपासून तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही. पंतप्रधान वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी 31 मार्च पर्यंतच आहे. याशिवाय जर तुम्ही आयटीआर फाइल करत असाल तर तुम्हाला 31 मार्चपूर्वी आयटीआर भरावा लागेल. अन्यथा दंड भरावा लागेल.