नीट घोटाळ्यात बिवाल कुटुंबाची भूमिका तपासात; अटक, छापे आणि विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे संशय वाढला

तपास यंत्रणेला संशय आहे की, या कुटुंबातील काही सदस्यांनी पेपरफुटी रॅकेटशी संबंधित उमेदवारांना मदत केली असावी.

  • Written By: Published:
Untitled Design 40 1

Biwal family’s role in NEET scam under investigation : नीट-युजी 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सुरू असलेल्या तपासामुळे चर्चेत आलेल्या बिवाल कुटुंबातील आणखी एका सदस्याने वैद्यकीय महाविद्यालयात जाणणे बंद केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जयपूरमधील एसएमएस मेडिकल कॉलेजमधील शिक्षण घेणारी बिवाल कुटुंबातील एक विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून वर्गांना अनुपस्थित आहे. या प्रकरणात कुटुंबाचे नाव समोर आल्यानंतर आणि सीबीआयने संबंधित ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही अनुपस्थिती वाढल्याचे सांगितले जात आहे.

नीट-युजी 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने दिनेश बिवाल, त्याचा भाऊ मंगीलाल बिवाल आणि मंगीलालचा मुलगा विकास बिवाल यांना अटक केल्यानंतर बिवाल कुटुंबातील अनेक सदस्य तपासाच्या कक्षेत आले आहेत. तपास यंत्रणेला संशय आहे की, या कुटुंबातील काही सदस्यांनी पेपरफुटी रॅकेटशी संबंधित उमेदवारांना मदत केली असावी. मात्र, या संपूर्ण नेटवर्कचा नेमका विस्तार किती आहे, याचा तपास अद्याप सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकरणाला वेग आल्यापासून एसएमएस मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनी वर्गांना उपस्थित राहत नसल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी देखील दौसा येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या याच कुटुंबातील आणखी एका सदस्याने अटकेनंतर महाविद्यालयात जाणे बंद केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने जयपूरजवळील जमवा रामगढ येथे असलेल्या बिवाल कुटुंबाच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. या छाप्यात आर्थिक व्यवहार, मोबाईल आणि संपर्क नोंदी तसेच आरोपी आणि परीक्षेला बसलेल्या उमेदवारांमधील संभाव्य संबंधाची चैकशी करण्यात येत आहे.

Mobile Recharges : आणखी एक धक्का; पेट्रोल-डिझेलनंतर मोबाईल रिचार्जही महाग होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, बिवाल कुटुंबाशी संबंधित एका मोठया रॅकेटचा देखील तपास सुरू असून प्रश्नपत्रिका आणि उत्तरे किती मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात आली होती, याचा शोध घेतला जात आहे. तपासातील प्राथमिक माहितीनुसार, गुरुग्राममधून अटक करण्यात आलेला यश यादव हा विकास बिवलच्या संपर्कात होता. त्याच्यामार्फत प्रश्नपत्रिका बिवाल कुटुंबापर्यंत पोहोचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिनेश बिवालने ही प्रश्नपत्रिका नीट-युजी 2026 ची तयारी करणाऱ्या आपल्या मुलाला दिल्याचा आरोप आहे. त्यानांतर ही प्रश्नपत्रिका इतरांना विकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच दिनेश बिवालच्या अल्पवयीन मुलाने देखील सीकर परिसरातील काही जणांना हेच प्रश्न शेअर केल्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत.

follow us