राहुल गांधींना बोलू द्या, अगोदर ‘त्या’ विधानाबद्दल माफी मागा; संसदेत मोठा गदारोळ
नवी दिल्ली : लोकसभेत (Lok Sabha) पाचव्या दिवशी कामकाज सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांतच संपले. सभागृहात घोषणाबाजीमुळे सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. राहुल गांधींना (Rahul Gandhi) बोलू द्या अशा घोषणा काँग्रेस खासदार देत होते. तर भाजप (BJP) गेल्या 4 दिवसांपासून राहुल गांधींच्या केंब्रिज वक्तव्यावर माफी मागण्याची मागणी करत आहे. राज्यसभेचे कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
सभागृह तहकूब झाल्यानंतर, महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ अदानी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांसह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत 16 विरोधी पक्ष सामील झाले होते.
सभागृहाच्या कामकाजादरम्यान ऑडिओ म्यूट करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. ही लोकशाही आहे का? लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही बुधवारी सांगितले होते की त्यांचा माईक 3 दिवस बंद करण्यात आला होता.
‘हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून…” अजित पवार संतापले; मुख्यमंत्री शिंदे धावत सभागृहात
राहुल गांधी गुरुवारी संसदेत पोहोचले होते आणि त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन सभागृहातील भाषणासाठी वेळ मागितला होता. दुसरीकडे राहुल गांधींनी माफी मागावी या मागणीवर भाजप ठाम आहे. भाजपचे निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
तसेच त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करावी, असेही सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज पाचवा दिवस आहे. पहिले चार दिवस राहुल गांधींचे लंडनमधील भाषण आणि अदानी प्रकरणावर झालेल्या गदारोळात गेले.