काँग्रेसची ओळख फक्त परिवारवाद अन् वंशवाद; भाजप स्थापनादिनी मोदींचा घणाघात
BJP Foundation Day : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यातच आज हनुमान जन्मोत्व देखील आहे. त्यामुळे हनुमानापासून जीवन पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते असे ते म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे.
भाजपचा आजा 43 वा स्थापना दिवस आहे. 1980 साली आजच्याच दिवशी भाजपची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्ताने मोदींनी कार्यकर्त्यांना संंबोधन केले आहे. भारत हा हनुमानाप्रमाणे बलशाली बनत आहे. हनुमानाचे जीवन आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी प्रेरणा देते. देश प्रथम हाच आमचा मुलमंत्र आहे. आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत. आजही हनुमानाचे जीवन हे भारताच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला प्रेरणा देते, असे मोदी म्हणाले आहेत.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना
यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील हल्लाबोल केला आहे. काँग्रेस म्हणजे घराणेशाही आहे. त्यांची संस्कृती आणि विचार लहाण आहेत. परिवारवाद, वंशवाद ही त्यांची ओळख आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ नाही; सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाही
आज सर्वत्र हनुमानाच्या नावाच जयघोष सुरु आहे. त्यांच्याकडे अफाट शक्ती आहे. बजरंगबलीप्रमाणे भारताला आपल्यातील सुप्त शक्तींचा साक्षात्कार झाला आहे, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपकडून आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.