Karnataka Elections : काँग्रेसचे ‘हे’ तीन नेते म्हणजे SMS; शिवराज मामांचा खोचक टोला

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T200253.232

Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसही यंदा जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज प्रचारासाठी कर्नाटक मध्ये आले होते त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला.
ते म्हणाले की सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खरगे आणि डीके शिवकुमार हे काँग्रेसचे नेते कर्नाटकच्या विकासासाठी धोकादायक आहेत. त्यांनी या तिन्ही नेत्यांना एसएमएस (SMS) म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खरगे आणि डीके शिवकुमार कर्नाटकच्या विकासासाठी धोकादायक आहे. ज्याप्रमाणे एखादा करप्ट मेसेज मोबाइल खराब करतो त्याप्रमाणेच हा एसएमएस कर्नाटकचे भवितव्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे दुहेरी इंजिन असलेले सरकारच कर्नाटकचे संरक्षण करू शकते, असा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला.

Rule Change : 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून विषारी सापासारखे असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. खर्गे यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही सुरू असलेला वाद थांबलेला नाही. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरूच ठेवली आहे. त्यानंतर भाजपने आणखी आक्रमक पवित्रा घेत खर्गे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

खर्गे यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत भाजपने म्हटले आहे की काँग्रेस अध्यक्षांनी याआधीही मोदीं बाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना इथून पुढे कर्नाटक निवडणुकीत प्रचार करण्यास बंदी घालावी अशी मागणी भाजपने केली आहे.

‘यह तो सिर्फ झांकी है, आगे…’, खासदार सुजय विखेंचा महाविकास आघाडीला इशारा

भाजप नेतेही बेलगाम

काँग्रेस नेत्यांवर टीका करताना भाजप नेत्यांकडूनही भाषेची मर्यादा पाळली जात नसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदाराने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा उल्लेख विषकन्या असा केला होता.

सोनिया गांधी या विषकन्या आहेत. सगळ्या जगाने मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. एक काळ असा होता की पंतप्रधान मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. नंतर त्यांनी रेड कार्पेट टाकलं आणि मोदींचं स्वागत केलं. आता खर्गेंनी पंतप्रधान मोदींना विषारी साप म्हटलं आहे. ते विष ओकत आहेत असं म्हटलं होतं. मात्र मी खर्गेना सांगू इच्छितो, की ज्या पक्षात तुम्ही नाचत आहात सोनिया गांधी विषकन्या आहेत. सोनिया गांधी या चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून त्यांच्या एजंटचं काम केलं, असं म्हणत भाजपा आमदार बासनगौडा यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती.

Tags

follow us