PM Modi यांच्या दौऱ्याआधीच भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक, तेलंगणात राजकीय राडा

  • Written By: Published:
PM Modi यांच्या दौऱ्याआधीच भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक, तेलंगणात राजकीय राडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तीन दिवस आधी तेलंगणा पोलिसांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांना अटक केली आहे. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार पेपर लीक प्रकरणी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, पण ते त्याला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार पोलिस त्याच्या घरी पोहोचताच भाजप कार्यकर्ते आणि बंदी संजय यांचे समर्थक त्याच्या घरी जमले होते. त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यानी एकच गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर टीका केली जात आहे.

Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार

यावर बंदी संजय यांनी स्वतःला ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, “बीआरएसमध्ये भीतीचे वातावरण आहे. आधी त्यांनी मला मीडियाला मुलाखत देण्यापासून रोखले आणि आता रात्रीच्या वेळी त्यांनी मला अटक केली आहे. माझी चूक एवढीच होती की मी बीआरएस सरकारच्या चुकीच्या कामांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी तुरुंगात राहिलो तरी तुम्ही लोक बीआरएसला प्रश्न विचारणे सोडू नका.”

तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाचा (टीएसपीएससी) सहाय्यक अभियंता (सिव्हिल) पेपर 5 मार्च रोजी होणार होता. पण तो पेपर लीक झाला होता. यामुळे आयोगाने १५ मार्च रोजीचा हा पेपर रद्द केला. याबाबत बंदी संजय यांनी सांगितले होते की, पेपर लीक प्रकरणातील काही धक्कादायक गोष्टी मला माहीत आहेत. या विधानाची चौकशी करण्यासाठी राज्य तपास यंत्रणेने (एसआयटी) त्यांना २६ मार्चपर्यंत हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. पण बंदी संजय हे या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत, यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube