Budget 2023 : ‘महिला सन्मान बचत पत्र सुरू ? अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

Budget 2023 : ‘महिला सन्मान बचत पत्र सुरू ? अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

Budget 2023: देशाच्या विकासाची गाडी सुसाट धावत असून त्याचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने तीन व्हिजन ठेवले आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) म्हणाल्या. ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. (Budget 2023) ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळाली, त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. केवळ आर्थिक मदतच केली नाही तर त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा करण्यात आली. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल. २ लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी ७.५ टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी श्री अन्न योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत बाजरी, ज्वारी, नाचणी यासारख्या बाजरी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. याशिवाय हैदराबादमध्ये मिलेट्स इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे, शहरी पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी 10 हजार कोटी रुपये दिले जातील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube