सोशल मीडियावरही Congress नेते होताहेत ट्रोल.. पाहा, काय घडले ?
नवी दिल्ली : सध्या संसदेचे आधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सत्ताधारी भाजपला (BJP) गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्द्यावर कोंडीत पकडले असून या मुद्द्यावर आधिवेशन गाजत आहे. तर दुसरीकडे असे काही प्रसंग घडत आहेत, ज्याचीही सर्वाधिक चर्चा होत आहे. प्रधानमंत्री मोदींच्या (PM Narendra Modi) जॅकेटची चर्चा आहे. खरे तर मोदी बुधवारी जे जॅकेट परिधान करून आले होते ते प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार केले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) मात्र सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लुई यांचा स्कार्फ लुई व्हिटॉन या ब्रँडेड कंपनीचा असल्याचा दावा भाजपने केला आहे. ज्याची किंमत सुमारे ५६ हजार रुपये आहे. यानंतर सोशल मीडियावर पीएम मोदींचे जॅकेट आणि खर्गे यांच्या स्कार्फची चर्चा सुरू झाली. लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणाआधी मल्लिकार्जुन खरगे अदानी प्रकरणाच्या संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी करत होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, जेपीसी चौकशी कोणत्याही एका व्यक्तीसाठी प्रस्तावित केली जाऊ शकत नाही. खरगे यांनी लुई व्हिटॉन स्कार्फ घातला आहे.याचीही JPC चौकशी करावी का? हा स्कार्फ त्यांनी कुठून आणला, कोणी दिला, त्याची किंमत काय?
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर पीएम मोदी (PM Modi) आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा एक फोटो शेअर केला आणि दावा केला की खरगे यांचा स्कार्फ लुई व्हिटॉनचा आहे आणि त्याची किंमत सुमारे ५६ हजार रुपये आहे. दोन्ही छायाचित्रे शेअर करताना परिक्षा आमची आहे, संदेश आमचा आहे,असेही लिहिले आहे. यानंतर लोकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्विटवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘खरगे साहेब इतर लोकांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.तर त्यांनी स्वतः ५६ हजार किमतीचा स्कार्फ घातला आहे. दांभिकपणा’ याआधी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनाही खर्चिक बॅगमुळे सभागृहात ट्रोल करण्यात आले होते. त्या सभागृहात महागाईच्या मुद्द्यावर बोलत होत्या. मात्र त्याच्याकडे १.६ लाखांची बॅग होती.