जम्मू काश्मीरमध्ये बसचा भीषण अपघात, 20 जणांचा मृत्यू, 30 जखमी; पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर

Bus accident in Jammu and Kashmir मध्ये बसचं नियंत्रण सुटलं आणि ती दरीमध्ये कोसळली. यामध्ये 20 जणांचा मृत्यू आणि 30 जण गंभीर जखमी झाले.

Bus Accident In Jammu And Kashmir

Bus accident in Jammu and Kashmir, 20 dead, 30 injured; PM announces financial assistance : जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यामध्ये रामनगर उधमपुर मार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये एका वळणावर प्रवासी बसचं नियंत्रण सुटलं यामध्ये 70 ते 80 फूट खोल दरीमध्ये बस कोसळली. यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू आणि 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंजिक्य रहाणेचा आयपीएलमध्ये प्लॉप शो ! सलामीला भोपळा न फोडणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर

ही बस सकाळी रामनगरहून उधमपुर या ठिकाणी येत होती. त्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करून यामध्ये सरकारी कर्मचारी, शाळा व कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी देखील असल्याचा सांगितले जात आहे. सकाळी नऊ वाजून 40 मिनिटांच्या आसपास हा अपघात घडला. अपघातानंतर पोलीस, ट्राफिक पोलीस, एसडीआयएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी युद्ध स्तरावर कामगिरी करून बचाव कार्य केले. पण ही बस अत्यंत खोल दरीमध्ये पडलेली असल्याने 30 जणांचा मृत्यू आणि 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

फडणवीस अभ्यासू पण दिल्लीतील प्रेशर आल्यामुळे ते… महिला आरक्षणावरील फडणवीसांच्या टीकेला सुळेंचे प्रत्युत्तर

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आणि आर्थिक मदत देखील जाहीर केली. ते म्हणाले , या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाला ही बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी प्रति संवेदना व्यक्त करतो. अपघातातील जखमी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना. त्याचबरोबर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत देण्यात येईल. असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं.

follow us