‘इंडिया’चं ‘भारत’ होताना तुमच्या खिशावर येणार 14 हजार कोटींचा बोजा; अफ्रिकन वकिलाचा फॉर्मुला काय?

‘इंडिया’चं ‘भारत’ होताना तुमच्या खिशावर येणार 14 हजार कोटींचा बोजा; अफ्रिकन वकिलाचा फॉर्मुला काय?

India Vs Bharat : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. अशातच आता आणखी एक बातमी आली आहे. इंडिया नाव काढून भारत करण्याच्या नामकरणात सरकारला तब्बल 14 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त पैसे खर्च करावे लागतील. एकूणच हा खर्च सरकार करणार असले तरी सरकारच्या उत्पन्नात कर रुपाने नागरिकांचा हिस्सा असतोच. म्हणजेच, अप्रत्यक्षपणे या खर्चाचा भार भारतीय नागरिकांच्याच खिशावर पडणार आहे.

आउटलुक इंडिया आणि ईटीच्या रिपोर्टनुसार, देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत करण्याचा अंदाजे खर्च 14304 कोटी रुपये असू शकतो. याचे मोजमाप दक्षिण आफ्रिकेचे वकिल डेरेन ऑलिवियर यांनी केले आहे. त्यांनी यासाठीचा एक फॉर्म्युला तयार केला आहे. याआधी सन 2018 मध्ये स्वाजीलँडचे नाव बदलून इस्वातीनी केले गेले होत त्यावेळी ऑलिवियर यांनी देशाचे नाव बदलण्यासाठी होणाऱ्या खर्चाची मोजणी करण्यासाठी फॉर्म्युला तयार केला होता.

India VS Bharat : नरेंद्र मोदींच्या ओळखपत्रावर आले ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

कॅल्क्यूलेशन काय ?

ऑलिवियर यांनी त्यावेळी देशाचे नाव बदलण्याच्या प्रक्रियेची तुलना मोठ्या कॉर्पोरेट संसथेच्या रिब्रँडिंगशी केली होती. त्यांच्या मते, मोठ्या कॉर्पोरेट संस्थेचे विपणन मूल्य (मार्केटिंग कॉस्ट) त्याच्या एकूण महसूलाच्या 6 टक्के असते. रिब्रँडिगसाठी कंपनीच्या एकूण मार्केटिंग बजेटच्या 10 टक्क्यांपर्यंत खर्च होतो. या फॉर्म्युल्यानुसार, स्वैजीलँडचे नाव इस्वातिनी करण्यासाठी 60 मिलीयन डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो असा त्यांचा अंदाज होता.

आता हाच फॉर्म्युला आशिया खंडातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजेच भारतासाठी लागू केला तर 2023 या आर्थिक वर्षात देशाचे उत्पन्न 23.84 लाख कोटी रुपये होते. यामध्ये टॅक्स आणि नॉन टॅक्स दोन्ही प्रकारचे उत्पन्न समाविष्ट आहे.

काय आहे नाव बदलाचा इतिहास ?

याआधी देशाचे नाव बदलण्याच्या प्रक्रियेवर अनेक वेळा विचार करण्यात आला आहे. सन 1972 मध्ये श्रीलंकेतही नाव बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर 40 वर्षे जुने नाव सिलोनला पूर्णपणे हटवण्यात आले. 2018 मध्ये स्वेजीलँड देशाचे नाव बदलून इस्वातीनी करण्यात आले.

Bharat : ‘इंडिया’च नाही तर ‘या’ नावांनीही भारताची ओळख; जाणून घ्या, इतिहास

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube