पाण्यात कॅन्सरला कारणीभूत घटक सापडले! FSSAI च्या कारवाईवर बिस्लेरीचं स्पष्टीकरण काय?

Bisleri’s explanation regarding FSSAI’s action बिस्लेरीच्या पाण्यात धोकादायक घटक आढळून आले आहेत. यावर आता बिस्लेरी कंपनीने स्पष्टीकरण दिले

Bisleri Explanation Regarding FSSAI Action

Cancer-causing agents found in water What is Bisleri’s explanation regarding FSSAI’s action : प्रवासात असो किंवा घरी देखील लोक पिण्याच्या सीलबंद पाण्याला प्राधान्य देतात. त्यात बिस्लेरी हा नामांकित ब्रँड आघाडीवर असतो. आता मात्र याचं पाण्याबाबात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बिस्लेरी इंटरनॅशनलच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या पाण्यात कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक आढळून आले आहेत. यावर आता बिस्लेरी कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, मुख्यमंत्रीसाहेब नार्वेकरांवर कारवाई करा; संजय राऊतांचा फडणवीसांना पत्र

बिस्लेरीने नेमकं काय म्हटलं?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिसलेरी कंपनीला नोटीस बजावल्याच्या वृत्तांची आम्हाला माहिती आहे. मात्र, हे प्रकरण सुमारे 14 महिन्यांपूर्वीचे असून, सप्टेंबर 2025 मध्ये गोव्यातील बिस्लेरीच्या उत्पादन केंद्रात तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या एका बॅचशी संबंधित आहे. बिस्लेरीच्या देशभरातील 143 उत्पादन केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे.

पाण्यात कॅन्सरला कारणीभूत घटक सापडले! FSSAI च्या कारवाईवर बिस्लेरीचं स्पष्टीकरण काय?

30 सप्टेंबर 2025 रोजी एफएसएसएआयने गोव्यातील या उत्पादन केंद्रातून पाण्याचे सहा नमुने गोळा केले होते. प्राथमिक तपासणीत सहापैकी पाच नमुने सर्व निर्धारित निकषांनुसार योग्य असल्याचे आढळले. मात्र, सहाव्या नमुन्यात प्रति लिटर 12 मायक्रोग्रॅम ब्रोमेट आढळले. हे प्रमाण निर्धारित 10 मायक्रोग्रॅम प्रति लिटरच्या मर्यादेपेक्षा जास्त होते.

अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, मुख्यमंत्रीसाहेब नार्वेकरांवर कारवाई करा; संजय राऊतांचा फडणवीसांना पत्र

बिसलेरीने या निष्कर्षाविरोधात अपील केल्यानंतर 22 नोव्हेंबर 2025 रोजी एफएसएसएआयने संबंधित नमुना पुन्हा तपासणीसाठी संदर्भ प्रयोगशाळेकडे पाठवला. या प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित नमुन्यातील ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. मात्र, त्याच नमुन्यात स्वतंत्रपणे पॉलीन्यूक्लियर अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याचेही प्रयोगशाळेने नमूद केले. दोन्ही तपासण्यांच्या निष्कर्षांमध्ये तफावत असल्याने या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे बिस्लेरीचे म्हणणे होते.

सोन्याच्या घसरणीला ब्रेक! चांदीचा भाव किती? भाव वाढीमागचे नेमके कारण काय?

त्यानंतर बिस्लेरीने एफएसएसएआयच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत त्याच नमुन्याची स्वतंत्रपणे तपासणी करून घेतली. या तपासणीतही ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे निष्पन्न झाले. या स्वतंत्र तपासणीचे निष्कर्ष बिसलेरीने 2 फेब्रुवारी 2026 रोजी पत्राद्वारे एफएसएसएआयच्या पश्चिम विभागीय कार्यालयाला सादर केले. त्यानंतर या प्रकरणासंदर्भात एफएसएसएआयकडून कोणताही पुढील पत्रव्यवहार झालेला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे प्रकरण बंद झाल्याचे आपल्याला समजले होते, असेही कंपनीने स्पष्ट केले. आजपर्यंत कंपनीला या प्रकरणासंदर्भात ई-मेल किंवा प्रत्यक्ष लेखी स्वरूपात कोणतीही नोटीस मिळालेली नाही. तसेच, एफएसएसएआयच्या संकेतस्थळावरही संबंधित नोटीस शोधून सापडलेली नसल्याचे बिसलेरीने म्हटले आहे.

भारत आणि न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित; भारताच्या हातून विजय निसटला

पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही बिस्लेरीसाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रणासाठी कंपनीकडून कठोर निकषांचे पालन केले जाते. उत्पादनाच्या दहा टप्प्यांमध्ये 90 पेक्षा अधिक चाचण्या केल्या जातात, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात योग्य नियामक प्रक्रियेच्या माध्यमातून एफएसएसएआयला सहकार्य करणे सुरूच ठेवणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले बिस्लेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित असल्याचा पुनरुच्चारही कंपनीने आपल्या निवेदनातून केला आहे.

 

follow us