बिहारच्या माजी मुख्यमंत्री Rabri Devi यांच्या घरी सीबीआयची धाड

बिहारच्या माजी मुख्यमंत्री Rabri Devi यांच्या घरी सीबीआयची धाड

पाटणा : सीबीआयचे (CBI) पथक लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Former Chief Minister Rabri Devi) यांच्या पाटणा येथील निवासस्थानी दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक दोन ते तीन गाड्यांमध्ये अचानक राबडी निवासस्थानी आले. गेल्या काही तासांपासून चौकशीला सुरूवात झाली. रेल्वे विभागातील जमीन आणि नोकर भरती प्रकरणात ही चौकशी केली जात असल्याचे समजले आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे विधानसभेच्या कामकाजासाठी रवाना झाले आहेत. मे २०२२ मध्ये, लालूं यांच्या व्यतिरिक्त, सीबीआयने लालूंच्या पत्नी राबडी देवी, दोन मुली मीसा भारती आणि हेमा यादव यांच्याबरोबरच त्यांच्या जवळच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. सीबीआयने या वर्षी मे महिन्यात लालू यादव, त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांच्या मुली मिसा यादव आणि हेमा यादव यांच्यासह १६ जणांची नावे आरोपी म्हणून घोषित केली होती.

आम्ही हेरलं म्हणून चोरलं, ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर

शिवाय काही अपात्र उमेदवारांना नोकरीच्या बदल्यात कमी किमतीत जमीन देऊ करण्यात आली होती, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २४ ऑगस्ट २०२२ रोजी सीबीआयने पुन्हा एकदा आरजेडी नेत्यांवर छापे टाकण्यात आले होते. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना (2004 ते 2009) या कालावधीमध्ये नोकरीसाठी जमीन घोटाळा झाला होता.

नोकरीसाठी जमीन घोटाळ्यात लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने मे २०२२ मध्ये लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे लालू यादव यांच्या कुटुंबीयांनी बिहारमध्ये १ लाख चौरस फूट जमीन केवळ २६ लाख रुपयांमध्ये विकत घेतली. तर त्यावेळच्या सर्कल रेटनुसार या जमिनीची किंमत सुमारे ४.३९ कोटी रुपये होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube