शनिवारी सकाळी फोनवर इमर्जन्सी सायरन वाजल्याने तुम्हीही घाबरले का? जाणून घ्या नेमकं प्रकर

Cell Broadcast alert System शनिवारी सकाळी देशभरामध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांनाना अचानक मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट आले.

Cell Broadcast Alert System

Cell Broadcast alert System Saturday morning Mobile phones Suddenly ringing in India : शनिवारी सकाळी देशभरामध्ये अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही स्मार्टफोन वापरकर्त्यांनाना अचानक मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट आले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तर एकाच वेळी अनेकांचे फोन वाजू लागल्याने भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. मात्र काही वेळानंतर हे इमर्जन्सी अलर्ट असल्याचा स्पष्ट झाला आहे. मात्र हे इमर्जन्सी अलर्ट नेमके कशासाठी होते? जाणून घेऊ सविस्तर…

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, निकाल जाहीर, राज्यात कोकण विभागाची बाजी तर कोणाचा निकाल सर्वात कमी?

भारत सरकारने नागरिकांना तात्काळ आपत्ती सूचना देण्यासाठी एक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केला आहे. यातून नागरिकांना सतर्क करणे आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवणे असा संदेश दिला जाणार आहे. जनतेकडून कोणतीही कृती यावर करण्याची आवश्यकता नाही. तसेच आज आलेले मेसेजेस हे केवळ चाचणी संदेश होते. असे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम म्हणजे काय?

ही प्रणाली एक आपत्कालीन स्थितीमध्ये सावध करणारी प्रणाली आहे. यातून सरकार कोणत्याही आपत्तीच्या क्षणी थेट मोबाईलवर अलर्ट पाठवू शकते. या आपत्तीमध्ये भूकंप, त्सुनामी, वीज कोसळणे, महापूर, गॅस लीग रासायनिक धोके तसेच इतर मानवनिर्मित संकटांमध्ये देखील याचा वापर केला जाईल.

नीलम गोऱ्हेंची संपत्ती 6 वर्षांत दहापट, सिद्दीकींची 2 वर्षांत चौपट; दानवेंची कौटुंबिक मालमत्ता 9 कोटींवर

ही सिस्टीम संकटकाळी नागरिकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवेल. त्यामुळे त्यांचे मोबाईल जोरजोरात सायरन्स सारखा आवाज येईल. स्क्रीनवर फ्लॅश मेसेज दिसेल आणि वापर करताना संदेश मिळेल. तसेच ही प्रणाली केवळ विशिष्ट प्रभावित भागातील लोकांच्या मोबाईलवरच माहिती पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

पुण्यात संतापजनक प्रकार, महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय व्यक्तीकडून 4 वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या

ही प्रणाली सी डॉट म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेली मॅटिक यांनी विकसित केली आहे. ती कॉमन अलर्टींग प्रोटोकॉलवर आधारित असून याची शिफारस इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन यांनी केली आहे. तसेच ही स्वदेशी इंटरग्रेटेड अलर्ट सिस्टीम म्हणजेच एसएसीएचइटी या माध्यमातून पाठवण्यात आले आहे. त्यामुळे भारत सरकारचा हा उपक्रम भारताच्या डिजिटल आपत्ती व्यवस्थापन नेटवर्कला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठ पाऊल मांडल जात आहे.

14 लाख विद्यार्थ्यांसाठी मोठा दिवस, दुपारी 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल

मात्र जर तुम्हाला हे इमर्जन्सी अलर्ट बंद करायचे असतील तर त्याचा देखील पर्याय असतो. त्यासाठी जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर सर्वप्रथम सेटिंग्समध्ये जा त्यानंतर सेफ्टी आणि इमर्जन्सीमध्ये जा त्यानंतर वायरलेस इमर्जन्सी अलर्टमध्ये जाऊन टेस्ट अलर्ट ऑन केव्हा ऑफ करू शकता.

follow us