चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ ची नॉट आऊट शतकी खेळी; इस्त्रोकडून आली गुड न्यूज

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 09 02T162939.547

Chandrayaan 3 Rover Latest News : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलेल्या चांद्रयान 3 (Chandrayan 3) बाबत इस्त्रोकडून देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर प्रज्ञाग रोव्हर चांगल्या पद्धतीने फिरत फिरत महत्त्वाची गोळा करण्याचे काम करत असून, प्रज्ञानने चंद्रावर नॉट आऊट शतकी खेळी पूर्ण केली आहे. लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञानने आतापर्यंत 100 मीटरचे अंतर कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण केले आहे, अशी माहिती इस्त्रोकडून (Isro) ट्विट करत देण्यात आली आहे.

प्रज्ञानला चंद्रावर आतापर्यंत काय काय सापडले?

चांद्रयान-3 चे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी यशस्वी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर सुमारे 14 तासांनंतर लँडरमधील प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असताना प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले आहे. त्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

ISRO कडून याबाबत अधिकृत ट्विट करण्यात आलं. त्यात सांगिलतं की, रोव्हरवर लावलेल्या लेझर ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर घटक असल्याची पुष्टी केली आहे. Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O (ऑक्सिजन) देखील आढळले आहेत.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. त्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर जाणं गरजेचं होते, त्यामुळं भारताने चांद्रयान-2 मोहित आखली होती. मात्र, दुर्दैवीनं इस्त्रोची ही चांद्रयान-2 मोहीम चंद्रावर सॉप्ट लॅंड करण्यात अपशस्वी झाली होती. त्यानंतर शास्त्रज्ञांनी पुन्हा चांद्रयान मोहिमेसाठी कठोर परिश्रम घेतले आणि चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरले होते. त्यानंतर चंद्रावर ऑक्सीजन आढळले आहे.

Tags

follow us